Covid Update: देशातील कोरोना रुग्ण संख्येत पुन्हा वाढ, महाराष्ट्रातील या दोन जिल्ह्यांनी वाढवली चिंता

0

मुंबई,दि.२८: Covid Update: देशातील कोरोना रुग्ण संख्येत पुन्हा वाढ होत आहे. महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांनी चिंता वाढवली आहे. कोरोनाची आकडेवारी सातत्याने वाढत असताना नागरिकांमध्येही चिंता वाढली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, देशातील १४ राज्यातील ३२ जिल्ह्यातील एका आठवड्याचा पॉझिटिव्ह रेट (TPR) १० टक्क्यांच्या पुढे आहे. मागील दोन आठवड्यात हा आकडा ३.५ टक्के वाढला आहे. दोन आठवड्यांपूर्वी ५ राज्यातील ९ जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट १० टक्के इतका होता. देशातील १९ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील ६३ जिल्ह्यांत १९ ते २५ मार्चमध्ये टीपीआर हा ५ ते १० टक्के इतका होता. जो दोन आठवड्यांपूर्वी ८ राज्यांतील १५ जिल्ह्यांमध्ये होता. महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांचाही यात समावेश आहे.

महाराष्ट्रातील या जिल्ह्यांनी वाढवली चिंता | Maharashtra Corona Update

दिल्लीतील चार जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचा पॉझिटिव्हिटी रेट अधिक आहे. दक्षिण दिल्लीत १३. ०८ टक्के, ईस्ट दिल्लीत १३.१ टक्के, नॉर्थ ईस्ट जिल्ह्यात १२.३ टक्के आणि मध्य दिल्लीत १०. ४ टक्के, अशी या जिल्ह्यांत स्थिती आहे. जास्त पॉझिटिव्ही रेट असलेले जिल्ह्यांच्या यादीत, केरळच्या वायनाडमध्ये १४.८ टक्के, कोट्टायममध्ये १०.५ टक्के, गुजरातच्या अहमदाबादमध्ये १०.७ यांचा समावेश आहे. तर, यामध्ये महाराष्ट्रातील सांगली १४.६ टक्के आणि पुणे ११.१ टक्के इतका पॉझिटिव्हिटी रेट नोंद केला आहे.

Covid Update

देशभरातील रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी | Covid Update

मागील वर्षी जानेवारी आणि मार्च दरम्यान भारतात कोरोना महामारीची तिसरी लाट आली होती. यावेळी कोरोना रुग्णांमध्ये लक्षणही सामान्य दिसत होते. तसंच, रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही कमी होते. आताही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आताही देशभरातील रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळं को लक्षणे दिसताच दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या, असं अवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनचे नॅशनल कोविड टास्क फोर्सचे चेअरमेन डॉ. राजीव जयदेवन यांनी म्हटलं आहे.

कोरोनाचा नवीन व्हेरियंट | Corona Update

राजधानी दिल्लीसह देशभरातील अन्य राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. महाराष्ट्रात सोमवारी २०५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. NSACOG नवीन रुग्णांच्या नमुन्याची जीनोम सीक्वेंसिग केल्यानंतर XBB.1.16 हा नवीन व्हेरियंट आढळून आला आहे. हा ओमिक्रॉनचा उपप्रकार आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, XBB .1.16 हा व्हेरियंट अल्फा, डेल्टा आणि ओमिक्रॉनसारखा घातक ठरु शकतो. हा व्हेरियंटचा फैलाव वेगाने होतो. मात्र, याची लक्षणे गंभीर नसल्याचं म्हटलं जातं.

XBB.1.16 हा विषाणूचा एक नवीन प्रकार आहे जो BA.2.10.1 आणि BA 2.75 या उपप्रकारांच्या संयोगातून विकसित झाला आहे. आतापर्यंत 14-15 देशांमध्ये त्याची प्रकरणे आढळून आली आहेत. माजी ICMR शास्त्रज्ञ डॉ ललित कांत म्हणाले, भारतात आतापर्यंत नोंद झालेले रुग्णांची लक्षणे सौम्य आणि गंभीर नाहीत. रूग्णांनाही रूग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही. त्यामुळं घाबरण्याची गरज नाही. मात्र, नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here