India Coronavirus: कोरोनाचा नवा व्हेरियंट देशातील नागरिकांसाठी किती धोकादायक?

0

नवी दिल्ली,दि.25: India Coronavirus: चीन, जपान, अमेरिका, कोरिया अशा देशांत कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Outbreak) वाढत असल्याचे वृत्त येत आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरीयंटने चीनमध्ये हाहाकार उडाला असल्याचे वृत आहे. कोरोनाच्या नवीन लाटेच्या भीतीमुळे केंद्र सरकारने (Central Government) गेल्या तीन-चार दिवसांत कोरोनाचा सामना करण्यासाठीच्या उपाययोजनांचा आढावा घेतला आहे आणि राज्यांना नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सरकारी सूत्रांनी सांगितलं की, आता कोरोना संसर्गाच्या तीव्रतेवर आणि जीनोम सिक्वेन्सिंगच्या परिणामांवर लक्ष केंद्रित केलं आहे. त्यामुळे तात्काळ कडक नियम होण्याची शक्यता नाही. संक्रमणामध्ये गुणात्मक वाढ तर होत नाही ना, हे पाहिलं जाईल. वाढ होत असल्याचं दिसल्यास वेळेनुसार प्रभावी पावलं उचलली जातील.

हेही वाचा Subramanian Swamy | शिंदे-फडणवीस सरकार अनैतिक: भाजपा माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी

तयारी पाहून लोकही धास्तावले | India Coronavirus

सरकारची तयारी पाहून लोकही धास्तावले आहेत आणि सावध होत आहेत. परंतु तज्ञ म्हणतात की सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे आणि आता घाबरण्याची गरज नाही. आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दैनंदिन चाचण्या वाढल्याने संक्रमित लोकांची संख्या वाढेल, परंतु सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ही वाढ गुणात्मक पद्धतीने होत नाही. म्हणजेच दररोज बाधितांची संख्या दुप्पट किंवा त्याहून अधिक वाढत नाही. कारण यापूर्वी जेव्हा जेव्हा कोविडच्या तीन लाटा आल्या तेव्हा त्याच वेगाने संसर्ग वाढला आणि दीड महिन्यात ते प्रमाण लाखांवर पोहोचले.

India Coronavirus

काळजी करण्यासारखे काही नाही | India Coronavirus News

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात सरासरी 1.25 लाख कोरोना चाचण्या केल्या जात आहेत आणि दररोज आढळणाऱ्या बाधितांची संख्या दोनशेहून कमी आहे. संसर्ग दर 0.15 टक्के किंवा त्याहून कमी आहे. देशात कोरोना महामारी सुरू झाल्यापासून हा दर सर्वात कमी आहे. त्यामुळे आता काळजी करण्यासारखे काही नाही.

जाहिरात

कोरोना व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय

चीनसह इतर काही देशांमध्ये वाढत्या केसेस पाहता कोरोना व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय करण्यासाठी आता काही उपाय केले जात आहेत. कारण गेल्या दोन वर्षांत भारताने महामारीच्या काळात ही यंत्रणा मोठ्या प्रमाणात मजबूत केली आहे. मॉनिटरिंग, कोरोना तपासणी, जीनोम सिक्वेन्सिंग, हॉस्पिटलमधील लाईफ सपोर्ट सिस्टिम, ऑक्सिजनची उपलब्धता आदी बाबी यात महत्त्वाच्या आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here