पिंपरी चिंचवडमध्ये नायजेरियातून आलेले दोन नागरिक कोरोना पॉझिटिव्ह

0

पिंपरी-चिंचवड,दि.१: दक्षिण आफ्रिकेत (south africa) कोरोनाचा नवीन व्हेरिएंट (omicron) आढळल्यानंतर अनेक देशात खळबळ माजली. भारतात सध्या या व्हेरिएंटचा एकही रुग्ण आढळलेला नाही. जगातील १५ देशांमध्ये ओमिक्रॉनचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. आता भारतात सुद्धा केंद्र सरकारने सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य विभागाकडून मिळाल्या सुचनेनुसार आता महाराष्ट्र सरकारने सुद्धा ओमिक्रॉन विषाणूला तोंड देण्यासाठी पावलं टाकायला सुरुवात केली आहे. परदेशातून आलेल्या लोकांची आर. टी. पी सी. आर. टेस्ट करण्यात येत आहे आणि प्रवासी पॉझिटिव्ह आढळल्यास जिनोम सिक्वेन्सिंगसाठी त्याची पुढील लॅब टेस्ट करण्यात येत आहे. याच तपासणी प्रक्रियेमुळं नायजेरियातून पिंपरी चिंचवाडमध्ये आलेले दोन नागरिक पॉझिटिव्ह असल्याचे त्यांच्या चाचणी अहवालातून समोर आले आहे. आता पुण्यातील एन. आय. व्ही येथे त्यांची जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा या रक्तगटाच्या व्यक्तींना असतो कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका

दक्षिण आफ्रिकेतून १५ दिवसांपूर्वी पुण्यात आलेली एक व्यक्ती देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. त्याला ओमायक्रॉनचा संसर्ग झाला आहे की कसे, याची खातरजमा करण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंग प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यातच आत आणखी दोघे पॉझिटिव्ह आढळ्यानं पुणेकरांची चिंता वाढली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here