Rahul Gandhi: राहुल गांधींच्या विचारांनी प्रभावित होऊन ७८ वर्षांच्या महिलेने सर्व संपत्ती केली राहुल गांधी यांच्या नावावर

0

डेहराडून,दि.4: उत्तराखंडमधील एका महिलेने आपली सर्व संपत्ती काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दिली आहे. डेहराडूनमधील एका 78 वर्षीय महिलेने आपली सर्व संपत्ती राहुल गांधींना दिली आहे. यामध्ये 50 लाखांची मालमत्ता तसेच 10 तोळे सोन्याचा समावेश आहे.

इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, पुष्पा मुंजियाल या उत्तराखंडच्या डेहराडूनमध्ये राहतात. त्यांचं वय 78 वर्ष आहे. पुष्पा यांनी त्यांची 50 लाखांची संपत्ती आणि 10 तोळे सोन्यासह त्यांची सर्व मालमत्ता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नावावर केली आहे. पुष्पा मुंजियाल यांनी डेहराडून न्यायालयात एक मृत्यूपत्र सादर केले असून, त्यांच्या मालमत्तेचे मालकी हक्क राहुल गांधी यांना दिले आहेत.

या महिलेचे म्हणणे आहे की, तिच्यावर राहुल गांधींच्या विचारांचा खूप प्रभाव आहे, म्हणून ती आपली संपत्ती राहुल गांधींच्या नावावर करत आहे. महिलेच्या संपत्तीमध्ये 50 लाखांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आणि 10 तोळे सोन्याचाही समावेश आहे.

पुष्पा मुंजियाल यांनी राहुल गांधी आणि त्यांचे विचार देशासाठी आवश्यक असल्याचं म्हटलंय. “मी राहुल गांधींच्या विचारांनी खूप प्रभावित आहे आणि म्हणूनच माझी संपत्ती त्यांना देत आहे,” असं पुष्पा मुंजियाल म्हणाल्या.

दरम्यान, काँग्रेसचे महानगर अध्यक्ष लालचंद शर्मा यांनी सांगितले की, “पुष्पा मुंजियाल यांनी माजी प्रदेशाध्यक्ष प्रीतम सिंह यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचं मृत्यूपत्र आणि मालमत्तेचे मालकी हक्क राहुल गांधींना दिल्याची कागदपत्रे सोपवली आहेत.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here