Omicron: कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ‘ओमिक्रॉन’ बाबत महत्वाची माहिती आली

0

दि.29: दक्षिण आफ्रिकेत (South Africa) कोरोनाचा नवीन व्हेरिएंट (omicron) आढळल्याने अनेक देशात खळबळ माजली आहे. भारतातही सरकारने निर्देश जारी केले आहेत. देशातही ओमिक्रॉम वेरिएंटमुळे धास्ती निर्माण झाली आहे. दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाच्या नवीन Omicron वेरिएंटबाबत एक माहिती समोर आली आहे, ज्यामुळे काहीसा दिलासा मिळणार आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण आफ्रिकेतील डॉक्टर म्हणतात की ओमिक्रॉन वेरिएंटने संक्रमित रुग्णाला अतिशय सौम्य लक्षणे दिसतात आणि घरीच उपचार करता येतात.

दक्षिण आफ्रिकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. अँजेलिक कोएत्झी (Dr. Angelique Coetzee) यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, त्यांच्या क्लिनिकमध्ये 7 रुग्ण आले होते ज्यांना डेल्टा प्रकारापेक्षा वेगळी लक्षणे होती आणि ती ‘अत्यंत सौम्य’ होती. त्यांनी सांगितले की, 18 नोव्हेंबरला त्यांच्याकडे रुग्ण आले होते, त्यांना अंगदुखी, डोकेदुखी अशा तक्रारी होत्या.

‘सामान्य व्हायरल तापासारखी लक्षणे’

डॉ. कोएत्झी म्हणाले की त्याची नव्या ओमिक्रॉन वेरिएंटची लक्षणे सामान्य व्हायरल तापासारखीच होती. प्रत्यक्षात 8 ते 10 आठवड्यात येथे एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही, म्हणून आम्ही चाचणी केली, ज्यामध्ये त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याच दिवशी आणखी काही रुग्ण त्यांच्याकडे हीच लक्षणे घेऊन आले. तेव्हापासून त्यांच्याकडे दररोज समान लक्षणे असलेले 2 ते 3 रुग्ण येत आहेत.

Covid-19 चा नवीन प्रकार B.1.1529 दक्षिण आफ्रिकेत गेल्या आठवड्यात सापडला. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने याला ‘वेरिएंट ऑफ कन्सर्न’ म्हणून घोषित केले आहे. त्याला ओमिक्रॉन असे नाव देण्यात आले आहे.

‘रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही’

डॉ. कोएत्झी हेच डॉक्टर आहेत ज्यांनी ओमिक्रॉन प्रकार प्रथम ओळखला. सरकारच्या लसीवरील सल्लागार समितीमध्येही त्यांचा समावेश आहे. त्यांनी सांगितले की आता येणाऱ्या रुग्णांमध्ये अतिशय सौम्य लक्षणे आहेत आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही. अशा रुग्णांवर घरीच उपचार करता येतात. त्यांनी असेही सांगितले की डेल्टा वेरिएंटप्रमाणे, ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णाला वास आणि चव देखील गेली नाही किंवा त्याची ऑक्सिजन पातळी कमी झाली नाही.

डॉ. कोएत्झी यांनी सांगितले की आतापर्यंत जे रुग्ण त्यांच्याकडे आले आहेत त्यापैकी बहुतेक 40 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत. यातील निम्मे रुग्ण हे असे होते की ज्यांना लसही मिळाली नव्हती. या नव्या वेरिएंटची लागण झालेल्या रुग्णाला एक-दोन दिवस खूप थकवा जाणवतो. त्यांना डोकेदुखी, अंगदुखी अशा समस्यांना सामोरे जावे लागते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here