राहुल द्रविड टीम इंडियाचा प्रशिक्षक झाल्यास, मिळणार इतके मानधन

0

दि.16: राहुल द्रविड टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्याची शक्यता आहे. सध्या टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) आहेत. आयसीसी टी-20 वर्ल्ड कपला 17 ऑक्टोबरपासून युएईमध्ये सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत 16 टीम सहभागी होणार आहेत. आतापर्यंत वेस्ट इंडिजच्या टीमला सर्वाधिक दोनवेळा टी-20 वर्ल्ड कप जिंकता आला आहे. यावेळी वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमला 12 कोटी रुपये रक्कम मिळणार आहे. हा टी-20 वर्ल्ड कप झाल्यानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री(Ravi Shastri) या पदावरून पाय उतार होणार आहेत. रवी शास्त्री यांच्यानंतर राहुल द्रविडकडे (Rahul Dravid) टीम इंडियाचं प्रशिक्षकपद दिलं जाईल, असं वृत्त आहे. राहुल द्रविडही यासाठी तयार झाल्याचं सांगितलं जात आहे.

राहुल द्रविडची टीम इंडियाचा कोच म्हणून नियुक्ती झाल्यास दोन वर्षांसाठी त्याला 10 कोटी रुपयांचं मानधन मिळणार आहे. म्हणजेच राहुल द्रविडला मिळत असलेलं हे मानधन टी-20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमला देण्यात येणाऱ्या मानधनाच्या रकमेएवढच आहे. टी-20 वर्ल्ड कपची फायनल हरणाऱ्या टीमला 6 कोटी रुपये मिळणार आहेत.

आयपीएल 2021 मध्ये (IPL 2021) चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) विजय झाला. यानंतर त्यांना 20 कोटी रुपये मिळाले. वर्ल्ड कप विजेत्या टीमपेक्षा ही रक्कम 8 कोटींनी जास्त आहे. तर दुसरीकडे उपविजेत्या कोलकात्याला (KKR) 12.5 कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली. टी-20 वर्ल्ड कपच्या उपविजेत्याला मिळणाऱ्या रकमेपेक्षा ही रक्कम दुप्पट आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here