How to Download e-Aadhaar: आधार कार्ड हरवले, असे डाऊनलोड करा ई-आधार 

e-Aadhaar: ई-आधार हे वैध मानले जाते

0

सोलापूर,दि.26: How to Download e-Aadhaar: आधार कार्ड हे अत्यंत महत्वाचे दस्तावेज मानले जाते. ट्रेनची तिकीट काढायचे असेल किंवा सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आधार कार्ड अनिवार्य असते. डिजिटल युगात आधार कार्डसारख्या महत्त्वाच्या कागदपत्रांच्या प्रत्यक्ष प्रती बाळगण्याचा ट्रेंड जवळपास संपला आहे. तथापि, तरीही अनेक लोक फिजीकल आधार कार्ड ठेवण्यास प्राधान्य देतात.

मात्र, हे आधार कार्ड खिशातून कुठेतरी पडले तर  आपत्ती ओढवल्यासारखे वाटते. तुमचे फिजीकल आधार कार्ड हरवले तर तुम्ही ई-आधार (e-Aadhaar) वापरून तुमचे कामे करू शकता हे तुम्हाला माहीत आहे का?

ई-आधार वैध आहे का? |  e-Aadhaar

यावर तुमच्या मनात एक प्रश्न येईल की ई-आधार हे देखील फिजीकल आधार कार्ड सारखेच आहे का?

तुमच्या प्रश्नाचे उत्तर होय आहे, आधार कायद्यानुसार, ई-आधार हे फिजीकल आधार कार्डइतकेच वैध मानले जाते. आता हा ई-आधार कुठून डाऊनलोड करायचे हा दुसरा प्रश्न आहे.

तुमच्याकडे तुमच्या आधार क्रमांक किंवा व्हर्च्युअल आयडी क्रमांकाबद्दल माहिती असल्यास, तुम्ही भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाइटवरून ई-आधार डाउनलोड करू शकता.

eAadhaar असे करा डाऊनलोड | How to Download e-Aadhaar

सर्वप्रथम तुम्हाला युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल ( https://uidai.gov.in/hi/ ).

आता खाली स्क्रोल करा आणि Get Aadhaar पर्यायातील Download Aadhaar वर क्लिक करा.

आता तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल.

आता कॅप्चा कोड टाकावा लागेल.

आता तुम्हाला Send OTP वर क्लिक करावे लागेल.

नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला OTP टाकावा लागेल.

आता स्क्रीनवर Verify आणि Download वर क्लिक करून आधार कार्ड डाउनलोड केले जाईल.

डाऊनलोड केलेला ई-आधार उघडण्यासाठी एक अद्वितीय पासवर्ड आवश्यक आहे. हा अनोखा पासवर्ड तुमच्या नावाची पहिली चार अक्षरे आणि तुमचे जन्मवर्ष एकत्र करून तयार केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here