Omicron Variant : Covishield चा बूस्टर डोस Omicronपासून किती संरक्षण करेल?

0

Omicron Variant : यूकेच्या एका नवीन अभ्यासातून कोविशील्ड लस (Covishield Vaccine) ओमिक्रॉन विरूद्ध 70-75 टक्के संरक्षण देऊ शकते अशी माहिती समोर आली आहे

Omicron Variant : कोरोना विषाणूच्या (Coronavirus) नवीन ओमिक्रॉन (Omicron Variant) प्रकाराने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दरम्यान, यूकेच्या एका नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे की ऑक्सफर्ड-ॲस्ट्राझेनेका लस (oxford astrazeneca vaccine), जी कोविशील्डच्या (Covishield Vaccine) नावाखाली भारतात वापरली जात आहे, ती ओमिक्रॉन (Omicron) विरूद्ध 70-75 टक्के संरक्षण देऊ शकते.

कोरोना विषाणूचा (Coronavirus) एक नवीन प्रकार, Omicron लस (Vaccinated) घेतलेल्या लोकांनाही संक्रमित करत आहे. लोकांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तिसऱ्या बूस्टर डोसवरही चर्चा सुरू आहे. दरम्यान, यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सी (UKHSA) ने शुक्रवारी सांगितले की कोविड-19 लसीचा तिसरा बूस्टर डोस ओमिक्रॉन (Omicron) प्रकाराच्या लक्षणात्मक संसर्गापासून 70-75 टक्के संरक्षण प्रदान करू शकतो.

आरोग्य एजन्सीने म्हटले आहे की ऑक्सफर्ड/ ॲस्ट्राझेनेका (oxford astrazeneca) आणि फायझर/बायोएंडटेक लसींचे (pfizer biontech vaccine) दोन्ही डोस COVID-19 च्या डेल्टा प्रकाराच्या तुलनेत ओमिक्रॉन विरुद्ध कमी संरक्षण देते. हे दावे 581 ओमिक्रॉन संक्रमित प्रकरणांमधील डेटाच्या विश्लेषणावर आधारित आहेत.

UKHSA च्या म्हणण्यानुसार, ‘सध्याच्या परिस्थितीत कोणताही बदल न झाल्यास या महिन्याच्या अखेरीस ब्रिटनमध्ये संसर्गाची प्रकरणे दहा लाखांच्या पुढे जातील असा अंदाज आहे. प्राथमिक डेटाने दर्शविले आहे की बूस्टर डोस नवीन प्रकाराविरूद्ध 70-75 टक्के संरक्षण प्रदान करू शकतो. हे आकडे पूर्णपणे नवीन असले तरी त्यामुळे अंदाजात बदल होण्याची शक्यता आहे. तज्ञांनी सांगितले की कोविड -19 च्या तीव्रतेविरूद्ध ही लस अजूनही चांगली संरक्षण असू शकते, जी रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी आवश्यक आहे.

UKHSA मधील लसीकरण प्रमुख डॉ. मेरी रामसे म्हणाल्या, ‘प्रारंभिक अंदाज पाहता, सावधगिरीने पुढे जावे. असे संकेत आहेत की दुसऱ्या डोसनंतर काही दिवसांनी, डेल्टा प्रकाराच्या तुलनेत ओमिक्रॉनचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. आम्हाला आशा आहे की कोविड-19 च्या गंभीर लक्षणांवर ही लस चांगले परिणाम देईल. जर तुम्ही अद्याप लसीचा पहिला डोस घेतला नसेल, तर तो लवकरात लवकर घ्यावा.

डॉ मेरी म्हणाल्या की, शक्यतो लोकांना घरातूनक काम करावे (Work From Home). गर्दीच्या ठिकाणी मास्क लावल्याशिवाय घराबाहेर पडू नका. आपले हात सतत धुत रहा किंवा स्वच्छ करत रहा. शरीरात रोगाची लक्षणे दिसल्यास त्याची तपासणी करून घ्या आणि स्वतःला आयसोलेशनमध्ये ठेवा.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here