कराची,दि.29: पाकिस्तानात हिंदू महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या (Atrocities on Hindus in Pakistan) बातम्या सतत येत असतात. पुन्हा एक हृदय हेलावणारी घटना समोर आली आहे. पाकिस्तानच्या सिंझोरो गावात एका हिंदू महिलेची अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या करून शिरच्छेद झाल्याची घटना बुधवारी (28 डिसेंबर) उघडकीस आली आहे. दया भील असं त्या 40 वर्षीय महिलेचं नाव होतं. या महिलचं डोकं धडावेगळं केलेलं होतं. तिचे स्तन कापण्यात आले होते. तसंच, तिच्या चेहऱ्यावरची आणि शरीरावरची त्वचाही सोलून काढण्यात आली होती. (Pakistan Hindu Attack)
शरीर आणि चेहऱ्यावरील कातडीही… | Atrocities on Hindus in Pakistan
हृदय हेलावणाऱ्या घटनेची माहिती कृष्णा कुमारी यांनी दिली आहे. कृष्णा कुमारी (Krishna Kumari) या पाकिस्तानमधील पहिल्या महिला हिंदू खासदार आहेत. पाकिस्तान पिपल्स पार्टीच्या नेत्या कृष्णा कुमारी यांनी पीडित महिलेच्या शरीर आणि चेहऱ्यावरील कातडीही सोलून काढण्यात आली असल्याचं सांगितलं आहे. पीडित महिलेला चार मुलं आहेत.
निर्घृण हत्या | Pakistan Hindu Attack
कृष्णा कुमार यांनी ट्वीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार “40 वर्षीय विधवा दया यांची निर्घृण हत्या करण्यात आली असून, वाईट अवस्थेत मृतदेह आढळला. तिचे शीर वेगळे करण्यात आले होते आणि रानटी लोकांनी संपूर्ण डोक्याचे मांस काढून टाकले होते. मी तिच्या गावाला भेट दिली. पोलिसांची पथकही पोहोचली आहेत”.
पाकिस्तान पिपल्स पार्टीच्या नेत्याने बुधवारी शेतात मृतदेह सापडला असल्याची माहिती दिली आहे. तसंच पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबाकडून माहिती गोळी केलं असल्याचं म्हटलं आहे. शवविच्छेदन करण्यात आलं असून पुढील तपास सुरु असल्याचंही या नेत्याने सांगितलं आहे.
सामूहिक बलात्कार
दरम्यान, ‘जागरण’ने दिलेल्या वृत्तातल्या माहितीनुसार, संबंधित महिलेची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. तिचा शिरच्छेद करण्यात आला. तसंच, तिचे स्तन कापून टाकण्यात आले. एवढं झाल्यानंतरही हे कृत्य करणाऱ्यांचं समाधान न झाल्याने नंतर तिची त्वचाही सोलण्यात आली होती.
पाकिस्तानच्या एकूण 220 दशलक्ष लोकसंख्येमध्ये केवळ 4 टक्के लोक अल्पसंख्याक आहेत. इतकेच नाही तर पाकिस्तानच्या 2017 च्या जनगणनेनुसार देशात 3.5 दशलक्ष हिंदू आणि 25 लाख ख्रिश्चन राहतात. पाकिस्तानमध्ये हिंदूंना मारहाण आणि मंदिरांची तोडफोड केल्याच्या बातम्या वारंवार येत आहेत. एवढेच नाही तर त्यांना इस्लामाबादमध्ये मंदिर बांधण्याची परवानगीही दिली जात नाही. हिंदू मुलींना बळजबरीने पळवून नेले जाते आणि त्यांचे लग्न लावून त्यांचे धर्मांतर करण्यास भाग पाडले जाते.