Hijab Ban Verdict: शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदीवर सर्वोच्च न्यायालयाने घेतला हा निर्णय

0

नवी दिल्ली,दि.13: Hijab Ban Verdict: शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदीवर सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. मागच्या काही महिन्यांपासून कर्नाटकात हिजाब घालण्यावरून वाद सुरू आहे. दरम्यान काही महाविद्यालयात हा वाद इतका टोकाचा झाला होता की यामध्ये हाणामारीही झाली होती. यानंतर कर्नाटक सरकारने यामध्ये लक्ष घालून प्रकरण मिटवले होते परंतु यावर कर्नाटक उच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. यावर आज सुप्रीम कोर्टाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने आज (दि.13) गुरुवारी कर्नाटकच्या हिजाब वादावर आपला निर्णय देण्यात आला.

हिजाब बंदीच्या मुद्यावरून सुनावणी करणाऱ्या सुप्रीम कोर्टातील दोन सदस्यीय खंडपीठात निकालाबाबत मतभिन्नता असल्याचे दिसून आले. न्या. सुधांशू धुलिया यांनी कर्नाटक हायकोर्टाचा निकाल अवैध ठरवला. तर, न्या. हेमंत गुप्ता यांनी हिजाब बंदीचा कर्नाटक सरकारचा निर्णय योग्य ठरवला. त्यामुळे आता हिजाब बंदीचे प्रकरण तीन सदस्यीय न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी जाणार आहे.

24 मार्च रोजी याचिकाकर्त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर आज सर्वोच्च न्यायालयात निर्णय होणार होता. यावर न्यायालयातील न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठात हिजाब वादावर 10 दिवस जोरदार चर्चा सुरू होती.

उलट तपासणी दरम्यान, मुस्लिम पक्षाने हिजाबची तुलना पगडीशी केली होती. न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांनी त्यावर टीका केली. दहा दिवसांच्या सुनावणीनंतर खंडपीठाने 22 सप्टेंबर रोजी निकाल राखून ठेवला होता, जो आज सुनावण्यात येणार आहे.

न्या. हेमंत गुप्ता यांनी म्हटले की, माझ्या निकालपत्रात 11 प्रश्न निश्चित करण्यात आले आहेत. याचिकाकर्त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्दांविरोधात हे प्रश्न आहेत. हिजाब बंदीविरोधातील याचिका फेटाळून लावाव्यात असे माझे निकालपत्रात नमूद करण्यात आल्याचे न्या. गुप्ता यांनी सांगितले. न्या. हेमंत गुप्ता यांनी कर्नाटक हायकोर्टाने हिजाब बंदी बाबत दिलेला निकाल योग्य ठरवला.

खंडपीठातील दुसरे न्यायमूर्ती सुधाशू धुलिया यांनी याचिका योग्य ठरवताना कर्नाटक हायकोर्टाचा निकाल अयोग्य ठरवला. हिजाब परिधान करणे हा व्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा असल्याचे त्यांनी म्हटले. कर्नाटक हायकोर्टाने निकाल सुनावताना धार्मिक प्रथेची संकल्पना या वादासाठी लक्षात घेणे अनावश्यक असल्याचे म्हटले. माझ्या दृष्टीने मुलींचे शिक्षण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांचे शिक्षण अधिक चांगले करू शकतो, या महत्त्वाचा मुद्दा असून हिजाब बंदीचा निकाल रद्द करत असल्याचे न्या. धुलिया यांनी सांगितले.

प्रकरण सरन्यायाधीशांकडे
दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने दिलेल्या निकालात मतभिन्नता असल्याने आता हे प्रकरण तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर जाण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीशांकडून या प्रकरणाच्या सुनावणीसाठी खंडपीठाची नियुक्ती होईल. त्यामुळे आता हिजाब बंदीचा निर्णय आता आणखी लांबण्याची शक्यता आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here