प्राणघातक हल्ल्याप्रकरणी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मंजूर

0

सोलापूर,दि.१ : दिनांक ०८/०७/२०२१ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास वाळू उपसा करण्यास विरोध केला म्हणून लक्ष्मण माने यांच्यावरती प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपावरून संजय माने रा. तपकिरी शेटफळ ता. पंढरपूर याचे विरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी आरोपीने दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात होऊन उच्च न्यायालयाने आरोपीचा अटकपूर्व जामीन मंजूर केला.

जखमी फिर्यादी लक्ष्मण माने, रा. महमदाबाद ता. मंगळवेढा याच्या माण नदीच्या शेतालगत असलेल्या माण नदीच्या पात्रातून वाळू उपसा करण्यासाठी विरोध केल्याने घटनेदिवशी आरोपीने लक्ष्मण माने याचेवर सळईने प्राणघातक हल्ला केला या आरोपावरून गुन्हा दाखल झाला होता. आरोपी संजय माने यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पंढरपूर सत्र न्यायालयाने फेटाळला होता.

त्यानंतर आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात ॲड. जयदीप माने यांच्यामार्फत अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. जामीन अर्जाची सूनावणी वेळी आरोपींच्या वकिलांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य धरुन आरोपीचा अटकपूर्व जामीन मंजूर केला.

याप्रकरणी उच्च न्यायालयात आरोपीतर्फे ॲड. जयदीप माने, ॲड. सिध्देश्वर खंडागळे, ॲड. विकास मोटे यांनी तर सरकारतर्फे ॲड. ए. आर. कापडणीस यांनी काम पाहीले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here