ब्लॅकमेल करुन अत्त्याचार प्रकरण युवकास उच्च न्यायालयात जामीन

0

सोलापूर,दि.9: फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवुन ब्लॅकमेल करुन फिर्यादी महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपावरुन अटकेत असलेला आरोपी अभिषेक कोरे, रा. कुमठा नाका, सोलापूर याच्या जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती सी. व्ही. भडंग यांचेसमोर होऊन न्यायमूर्तींनी आरोपीची जामीनावर मुक्तता केली.

या खटल्याची हकीकत अशी की, यातील पिडीतेशी संपर्क करुन ओळख वाढवून त्यानंतर तिचेसोबत व्हाटसअप चॅटिंग करुन तिच्याशी जवळीक साधुन तिच्यासोबत सेल्फी व फोटो काढून ते व्हायरल करण्याची आरोपी धमकी देवुन आरोपीने पिडीत महिलेबरोबर वेळोवेळी संबंध केला. या आरोपावरुन आरोपीस सांगोला पोलिसांनी अटक केलेली होती. याप्रकरणी सदर महिलेने फिर्याद दिल्यानंतर सांगोला पोलिसांनी आरोपीवर गुन्हा नोंद करुन
त्यास अटक केली होती.

तपास पुर्ण होऊन पोलिसांनी न्यायालयात दोषारोपत्रक दाखल केले होते. आरोपीने पंढरपुर सत्र न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर आरोपीने जामीन मिळणेसाठी मुंबई उच्च न्यायालयात ॲड. जयदीप माने यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी. व्ही. भडंग यांचेसमोर झाली.

युक्तिवादावेळी आरोपीचे वकील ॲड. जयदीप माने यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिले की, आरोपीने कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केली असे दिसुन येत नाही. आरोपी व पिडीत महिला यांचेतील मोबाईल रेकॉर्डींग संभाषणावरुन असे लक्षात येते की आरोपी व सदर पिडीत
महिला यांचेत प्रेमप्रकरण होते. दोन्ही बाजुचा युक्तिवाद ऐकून न्यायमुर्तींनी आरोपीची जामीनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.

या प्रकरणी आरोपीतर्फे ॲड. जयदीप माने, ॲड. अतुल भोसले (सांगोला), ॲड. सिध्देश्वर खंडागळे यांनी तर सरकारपक्षातर्फे ॲड. आर. एम. पेठे यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here