Hidayat Patel: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेते  हिदायतुल्ला पटेल यांची हत्या 

0
Hidayat Patel: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेते हिदायतुल्ला पटेल यांची हत्या

अकोला,दि.७: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची हत्या करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात महाराष्ट्र काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायतुल्ला पटेल (Hidayat Patel) यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. बुधवारी सकाळी उपचारादरम्यान जखमी झालेल्या पटेल यांचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अकोट तालुक्यातील मोहल्ला गावात मंगळवारी दुपारी १:३० वाजता जुन्या मनस्यातून आरोपीने हिदायतुल्ला पटेल (६६) याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. पटेल यांच्या हाताला आणि छातीला गंभीर दुखापत झाली असती आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. 

मूळगावातील मोहाळा येथील मरकझ मशिदीमधून बाहेर पडताच एका व्यक्तीने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. हिदायत पटेल हे मशिदीतून बाहेर येत असताना हल्लेखोराने त्यांच्या पोटात व मानेवर चाकूने वार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. जखमी अवस्थेत त्यांना तत्काळ अकोट येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोल्यातील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. आज पहाटे उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांची प्रकृती खालावली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 

या घटनेशी संबंधित काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत ज्यामध्ये पटेल रक्ताने माखलेल्या कपड्यांमध्ये दिसत आहेत. हिदायतुल्ला पटेल मंगळवारी मोहाला येथील जामा मशीदित दुपर्ची येथे नमाज अदा करण्यासाठी गेले होते. दुपारी १२:०० वाजता नमाज अदा केल्यानंतर, मशीदितुन बाहेर येत असताना, जमावाने त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक लोकांनी पटेल यांना तात्काळ रुग्णालयात नेले. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून फॉरेन्सिक तज्ञांच्या मदतीने पुरावे गोळा केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here