जाडेपणा नक्की काय असतो ? (Tips for weight loss in Marathi) जाडेपणा (Obesity) म्हणजे शरीरामध्ये गरजेपेक्षा जास्त फॅट अर्थात चरबी साचायला लागते. त्यामुळे शरीरावर अतिशय वाईट परिणाम होत असतो. हेच नाही तर अनेक रोगांनाही आपण आमंत्रण देत असतो. एका जागी बसून राहिल्याने, चुकीची जगण्याची पद्धत किंवा शारीरिक व्यायाम कमी करणाऱ्या लोकांना सर्वात जास्त या समस्येला सामोरं जावं लागतं.
Tips for weight loss in Marathi : हे अगदी सहज शक्य आहे, त्यासाठी रात्रीची झोप उडवायची गरज नाही.
“मला वाटते की माझं वजन (weight) खूप वाढलं आहे आणि मला बारीक व्हावंच लागेल.” पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय कसे शक्य आहे? ह्या विचाराचे रुपांतर काहीही करून वजन कमी करायचे उपाय शोधण्यामध्ये होते. (Tips for weight loss in Marathi)
शरीर सुडौल राखण्यासाठी व्यायामशाळेत तासंतास व्यायाम करणे, जिभेवर ताबा ठेवत मिळमिळीत अन्नाची सवय लावणे असे अनेक उपाय आपण करून बघितले असतीलच. पण समजा तुम्हाला एक नैसर्गिक, दुष्परिणाम नसलेला, अत्यंत सुलभ आणि १५-२० मिनिटे घेणारा उपाय मिळाला तर कसं होईल? (Tips for weight loss in Marathi)
याच बरोबर काही योगासन पण आपल्याला वजन कमी करण्यास मदद करतात. (Tips for weight loss in Marathi)
ध्यानसाधना: अतिशय सुलभ पण अत्यंत प्रभावी तंत्र. ध्यानसाधना तर मन शांत करण्यासाठी असते, मग त्याचा वजन कमी करण्याशी काय संबंध, असा विचार मनात येतोय का? ते कसे शक्य आहे ते पुढे पाहू या……..
1) सहजपणे बीएमआर कमी करा
जर तुम्ही वजन घटवण्याच्या “मोहिमेवर” असाल तर नियमितपणे BMR (Basal Metabolic Rate) म्हणजेच खाल्लेल्या अन्नाचे ऊर्जेत रुपांतर करण्याची गती) तपासण्याची गरज असते. तुम्हाला तुमच्या शरीराचा BMR माहित असेल तर तुम्ही तुमच्या जेवणातील कॅलरीज कमी करू शकता, जेणेकरून वजन आपोआप नियंत्रित राहील. ध्यान केल्याने तुमचे BMR आपणहून कमी होते. म्हणजेच अतिरिक्त कॅलरीज घेण्याचे प्रमाण आपसूकच कमी होते ज्यामुळे वजन आपोआपच कमी होते.
2) तुमच्या व्यायामाची सवय शिस्तबद्ध असू द्या:
तुमच्या लक्षात आले असेल की जर तुम्ही काही दिवस व्यायाम केला नाहीत तर लगेच तुमचे वजन पुन्हा वाढू लागते. ह्याचे कारण, तुम्ही जेवढे जेवता तेवढ्या कॅलरीज जाळत नाही. व्यायाम केल्याने फक्त तुमची भूक वाढते पण अन्नाचं शरीरात पूर्णपणे संमिलन होत नाही.
योगाभ्यास केल्याने अन्नाचं शरीरात पूर्णपणे संमिलन होण्याच्या प्रक्रियेला गती मिळते व जड असलेले अन्न सेवन करण्याची रुची कमी होते. म्हणजेच भूक तर लागते पण थोडेसे खाऊन तृप्ती येते. ह्याचा दीर्घकालीन परिणाम असा होतो की तुम्ही काही दिवस व्यायाम सोडला तरी वजन लगेच वाढत नाही.
3) तुमचा समतोल पुनर्स्थापित करा
अवाजवी वजन वाढणे किंवा कमी होणे हा हार्मोन्स (संप्रेरक) असंतुलित झाल्याचा परिणामही असू शकतो. ध्यानसाधना केल्याने शरीरातील सर्व प्रणालींचा ताळमेळ जमून येतो. परिणामी तुम्ही स्थूल असाल तर वजन कमी करता येते किंवा तुमचे वजन कमी असेल तर ते वाढवता येते.
4) चटकदार खाणे कमी करा
वजन कमी करण्यात सगळ्यात मोठा अडसर म्हणजे लज्जतदार पदार्थ खाण्याची लागलेली चटक. एखाद्या मिठाईच्या दुकानाजवळून जाताना आसपास दरवळणाऱ्या गोड वासामुळे तो पदार्थ घेऊन खाण्याचा मोह आवरत नाही. पण नियमित ध्यान केल्याने मनावर ताबा ठेवणे थोडे सोपं होते.
ध्यान केल्याने जागरूकता वाढते, आपल्याच खाण्या-पिण्याच्या सवयींबाबत सतर्कता वाढते. मग पुन्हा कधीही तुम्ही चॉकलेट किंवा चिप्स घ्यायला जाल तेव्हा तुम्ही सतर्क व्हाल की हे खाल्ल्याने माझे वजन वाढेल. मग त्याऐवजी तुम्ही दुसरे काही तरी पौष्टिक पर्याय शोधाल. काही कालांतराने नियमित ध्यान केल्याने तुमच्या इच्छा नाहीशा होतात. मग तुम्ही ते चिप्स किंवा चॉकलेट घेण्यास कधीच जाणार नाहीत.
दिव्या सचदेव म्हणतात, “गेल्या एका वर्षापर्यंत मला चॉकलेट खाण्याची इतकी सवय होती की ,दिवसातून एक तरी चॉकलेट खाल्ले नाही तर मी अस्वस्थ व्हायचे. माझे वजन भरपूर वाढत होते पण ह्या सवयीचा त्याग कसा करावा तेच कळत नव्हते. पण दोन महिने नियमित ध्यान केल्याने चॉकलेट खाण्याची तीव्र इच्छा / वासना / लालसा कमी झाली. मी नियमीतपणे ध्यान करणे चालू ठेवले आणि माझं वजन ७ किलोनी कमी झाले”.
5) आपला संकल्प मजबूत असू द्या:
आपली वजन कमी करण्याची मोहीम अर्धवट सोडून देणे किती सोपे असते माहित आहे का? अतिनिद्रा, अरबट चरबट खाणे व गोड पदार्थ ह्यांचा तुमच्या मोहिमेवर परिणाम सहज होऊ शकतो. ही तुमच्या संकल्प शक्तीची परीक्षा ठरू शकते. इथेही ध्यानाचा फायदा नक्कीच होऊ शकतो. ध्यान केल्याने तुमची संकल्प शक्ती वाढते ज्यामुळे व्यायाम करणे, हलका मर्यादित आहार घेणे व चांगल्या सवयी ठेवण्या प्रतीची प्रतिबद्धता वाढते.
ध्यान केल्याने आपले संकल्प पूर्ण करण्याची शक्ती मिळते.
मयांक ठक्कर म्हणतात, “ध्यान केल्याने अंत:शक्ति आणि इच्छा शक्ति मिळते, ज्याच्यामुळे रोज व्यायाम करण्यासाठी मी प्रतिबद्ध राहू शकतो.”
6) भरपूर भाज्या खा आणि तणाव दूर ठेवा
ज्या वेळेस तुम्हाला चॉकलेट किंवा इतर अरबट-चरबट खाण्याची इच्छा होईल, तेव्हा तुम्ही थोडा विचार करा की मी हे का खात आहे? घरचा किंवा कामावरचा काही तणाव विसरण्यासाठी मी हे खात आहे का? मनातील तणावामुळेही वारंवार काही ना काही खात राहण्याची इच्छा होत राहते. ह्यामुळे थोडा फार तणाव निवळतो पण ध्यान केल्याने खोलवर जमा झालेला तणाव नैसर्गिकरित्या निवळू लागतो. ध्यान करणे ही नैसर्गिकरित्या तणाव निवारणाची व त्याच बरोबर वजन नियंत्रित ठेवण्याची उत्तम पद्धत आहे.
कोमल कौर म्हणतात, “पूर्वी जेव्हा माझ्या बॉय फ्रेंडशी माझं भांडण व्हायचं त्या वेळेस तणाव दूर करण्यासाठी मी वाजवी पेक्षा जास्तं खायचे. पण माझ्या वजन कमी करण्याच्या मोहिमेत जेव्हापासून सुदर्शन क्रिया आणि ध्यानाला समाविष्ट केलं, तेव्हापासून चित्र बदललं. ह्याचं कारण की परिस्थिती कशीही असली तरी मी शांत राहू लागले आणि तणाव घालवण्यासाठी जास्तं खाणं कमी झालं, वजनावर नियंत्रण ठेवण्यास मदत झाली.
7) वजन कमी करण्यासाठी वेळ देण कठीण होतेय का?
वजन कमी करण्यासाठी तुम्हाला व्यायामाला वेळ देता येत नसेल तर ध्यान करणे हा रामबाण उपाय ठरू शकतो. ‘ध्यान केल्याने दिवसभरात जास्तं वेळ मिळू लागेल. आणि ध्यान करण्यासाठी फक्त १५-२० मिनिटे लागतात. दिवसभरात तेवढा वेळ काढणे सहज शक्य आहे नाही का? तुमच्या शरीराला तेवढा वेळ देणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही ध्यान करता, तुमची कार्यक्षमता प्रचंड वाढते, ह्याचा परिणाम म्हणजे तुम्ही कोणताही काम लवकर आटपू शकता. परिणामी वजन घटवण्याच्या मोहिमेला जास्तं वेळ देऊ शकाल.
8) स्वत:चेच लाड करा
विचित्र वाटतंय? पण प्रश्न असा उद्भवतो की जेव्हा आपणच आपला लट्ठपणा स्वीकारलेला आहे तर मग वजन कमी करण्याची गरजच काय? ह्याचे उत्तर असे की अशी स्वीकृती आली की मन शांत होते आणि चिंता करणे थांबते. अशा मनस्थितीमुळे वजन कमी करण्याकडे जास्तं लक्ष देता येते, आणि तुम्ही केलेले प्रयत्न जास्तं परिणामकारक ठरतात.
सूचना: प्रत्येकाची शरीर बांधणी वेगळी असते त्यामुळे योगा-ध्यान केल्याने त्याचा प्रत्येकावर होणारा परिणाम वेगवेगळा असू शकतो, भिन्न अनुभव असू शकतात. म्हणूनच आपल्या अनुभवाची तुलना दुसऱ्याच्या अनुभवाशी करू नये. संयम राखा, ध्यान म्हणजे जादूची कांडी नव्हे ज्याचा परिणाम लगेच दिसून येईल. रोज अभ्यास / सराव केला तर नक्की फरक जाणवेल.
श्री श्री रवि शंकरजींच्या ज्ञान वार्तेवरून प्रेरित
लेखिका : प्रीतीका नायर.
भारथी हरीश व प्रियदर्शनी हरिराम ह्या सहज समाधी प्रशिक्षकांनी दिलेल्या माहितीवर आधारित