तुम्हालाही असा व्हाट्सॲप मेसेज आला आहे का?

0

सोलापूर,दि.3: फसवणूक करणारे गुन्हेगार वेगवेगळे मार्ग शोधून काढतात. व्हाट्सॲपवर मेसेज पाठवून फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. फोनवर आलेला ओटीपी विचारून अनेकांची आर्थिक फसवणूक झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. बँकेचे कर्ज मंजूर झाले असून रक्कम खात्यावर जमा करण्याच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केली जाते. एबीपी माझानेही यासंदर्भात वृत्त दिले आहे.

अनेकदा मोबाईल कंपन्याचे टॅावर बसवून देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवूण झाल्याच्या घटना घडतात. सायबर गुन्हेगार प्रत्येकवेळी नवनवीन युक्तीवापरून फसवणूक करतात. घरबसल्या पैसे कमवा असे सांगून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. आता सोशल मिडीयाद्वारे फसवूण करण्याचे प्रकार वाढत आहेत.

अलिकडच्या काळात व्हाट्सॲपवर अनेकांना Hello ! How are you असा मेसेज अनोळखी नंबरवरून येत आहे. अशाप्रकारचा मेसेज सायबर गुन्हेगारीशी संबंधित असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. अशाप्रकारच्या मेसेजला जर समोरच्या व्यक्तीने प्रतिसाद दिला की समोरून लगेच पैसे कमावण्याबाबत सांगत लिंक पाठवली जाते.

अशाप्रकारच्या लिंकवर क्लिक करणे महागात पडू शकते. सायबर गुन्हेगार सर्वेची लिंक आहे असे भासवतात. घरबसल्या सर्वेमध्ये सहभागी होऊन दिवसाला 5000 रूपये कमवू शकता, असे आमिष दाखवतात. अनेकजण अशा आमिषांना बळी पडतात.

सायबर गुन्हेगार लिंक पाठवतात, समोरच्याने जर लिंकवर क्लिक केले तर मोबाईलमधील सर्व माहिती गुन्हेगाराला मिळू शकते. एकदा का जर तुमच्या मोबाईलवर गुन्हेगारांनी ताबा मिळवला की तुमची मोठी आर्थिक फसवणूक झालीच समजा.

त्यामुळे कुठल्याही आर्थिक प्रलोभांना बळी न पडता असल्या मेसेजला उत्तर देणे टाळा. तसेच अशा नंबर्सना लगेच ब्लॅाक करा.

अशी घ्या काळजी

• अनोळखी नंबरला रिप्लाय देऊ नका.

• अनोळखी नंबरवरून आलेल्या अशा मेसेजकडे दुर्लक्ष करा.

• मेसेजमध्ये लिंक, फोटो असल्यास त्यावर क्लिक करु नका. यामुळे तुमचा डेटा हॅक होण्याची भीती आहे.

• असे व्हायरल मेसेज येत असल्यास असे नंबर ब्लॉक करा.

• तुमच्या मोबाईलच्या प्रायव्हसी सेटिंग्स बदलून डेटा अधिक सुरक्षित करा.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here