तुमचा Pan Card नंबर वापरून कुणी कर्ज तर घेतले नाही ना? असे तपासा

0

दि.17: Pan Card आणि Aadhar Card हे महत्वाचे आहेत. अनेक ठिकाणी पॅन कार्ड व आधार कार्ड लागते. अनेक ठिकाणी पॅन कार्ड व आधार कार्डचे झेरॉक्स लागते. आपण आपलं पॅनकार्ड अनेक ठिकाणी देत असतो. अनेकदा आपण पॅनकार्डच्या झेरॉक्सवर सही करणं किंवा ते कोणत्या कामासाठी देत आहोत ते देखील लिहीत नाही. अशावेळी तुमच्या पॅनकार्डचा वापर करुन खूप मोठा फ्रॉड देखील होऊ शकतो.

पॅनकार्डचा दुरुपयोग करुन तुमच्यासोबत मोठा फ्रॉड देखील होऊ शकतो. पॅन आणि आधारवरच बँका कर्जाची प्रक्रिया पुढे नेत असतात. त्यामुळे पॅनकार्डचे डिटेल्स वारंवार तपासून पाहण्याची खूप गरज आहे. आपल्या पॅनकार्डचे सर्व डिटेल्स आपण ऑनलाइन पद्धतीनं पाहू शकतो. काही क्षणात तुमच्या पॅनकार्डचे सर्व रेकॉर्ड तुम्हाला ऑनलाइन पाहता येऊ शकतात आणि त्यात काही गैरप्रकार आढळून आला असेल तर तक्रार देखील करू शकता.

एक घटना चेन्नईतून समोर आली आहे की जिथं पॅनकार्डचा गैरवापर करून बँकेकडून कर्ज घेण्यात आलं होतं. यात कथित फिनटेक कंपनी ‘धनी ॲपचं नाव समोर आलं आहे. त्यामुळे अशावेळी आता आपल्या पॅनकार्डच्या वापरासंबंधी अधिक काळजी घेण्याची वेळ आली आहे. फिनटेक कंपनी धनी अॅप विरोधात आता युझर्सनं अभियान सुरू केलं असून या कंपनीनं आपल्या पॅनकार्डचे डिटेल्स अनेकांना दिल्याचा आरोप युझर्सनं केला आहे. अनेकांनी तक्रारीत आपल्याला कोणतंही लोन मिळालेलं नसतानाही पॅनकार्डचा वापर करुन अनेकांना लोन देण्यात आल्याचं म्हटलं आहे.

तक्रार केलेल्यांच्या पॅनकार्ड क्रेडिट रेकॉर्डमध्ये कर्जाचे पैसे दाखवत आहेत. पण संबंधित लोकांनी कोणतंही लोन घेतलेलंच नाही. तसंच कर्जाचे पैसे भरण्यासाठी त्यांना फोनकॉल येत असल्याचंही तक्रारदारांनी म्हटलं आहे. कर्ज मिळवण्यासाठी बँकेकडे काही महत्त्वाची कागदपत्र जमा करावी लागतात. यात पॅनकार्ड अतिशय महत्त्वाचं ठरतं. याचाच वापर करुन अनेकांना ठगवण्यात आल्याचं समोर आलं आहे. आता या घोटळ्यांपासून कसा बचाव करायचा आणि पॅनकार्डचे डिटेल्स कसे पाहायचे हे जाणून घेऊयात..

तुमच्या पॅनकार्डचा दुरुपयोग झाला आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी तुम्हाला सिबील पोर्टलवर जाऊन सिबिल स्कोअर आणि क्रेडिट हिस्ट्री तपासून पाहावी लागेल. हे काम आपण ऑनलाइन करू शकतो. याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊयात. सर्वातआधी सिबिल पोर्टल https://cibil.com/ वर भेट द्या. उजव्याबाजूस खालील कोपऱ्यात Get your CIBL Score पर्यायावर क्लिक करा. यातील एका सब्सक्रिप्शन प्लान निवडा. पुढे येणारी सर्व वैयक्तिक माहिती भरा. त्यानंतर तुमच्या लॉगइन आयडी आणि पासवर्ड तयार करा.

आयटी पर्यायात Income Tax ID पर्याय निवडा आणि पॅनकार्डची माहिती भरा. Verify your identity वर क्लिक करा आणि सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं द्या. Make payment tab पूर्ण करा. जर तुम्हाला एकदाच तुमची माहिती तपासून पाहायची असेल तर सबस्क्रिप्शन घेऊ नका. ई-मेल किंवा मोबाइल नंबर ओटीपीच्या माध्यमातून लॉगइन करा. एक फॉर्म समोर येईल तो भरा. त्यानंतर तुमचा सिबिल स्कोअर तुम्हाला मिळून जाईल.

अशी करा तक्रार

जर तुमच्या पॅनकार्ड डिटेल्समध्ये तुमच्या पॅन नंबरचा गैरवापर केला गेलेला असल्याचं दिसून आल्यास आयकर विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्या. या माध्यमातून तुम्ही तुमची तक्रार दाखल करू शकता. जे थेट तुमच्या UTITSL किंवा NSDL ला जोडलेले असते. नेमकी तक्रार कशी दाखल करायची हे जाणून घेऊयात…

सर्वात आधी https://incometax.intelenetglobal.com/pan/pan.asp या संकेतस्थळाला भेट द्या. त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा आणि तुमची सर्व माहिती भरा. यात तुम्हाला नेमकी कोणत्या पद्धतीची तक्रार दाखल करायची आहे याची सर्व माहिती द्यावी लागेल. शेवटी सबमिट बटणावर क्लिक करुन तुमची तक्रार दाखल करून घेतली जाईल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here