वाराणसी,दि.16: Gyanvapi Masjid Survey: ज्ञानवापी मशीद सर्वेक्षण प्रकरणात, उत्तर प्रदेशातील न्यायालयाने ज्ञानवापी मशीद संकुलातील तलाव जिथे “शिवलिंग” सापडले आहे सील करण्याचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानवापी मशीद सर्वेक्षणादरम्यान, मशिदीच्या वरच्या भागात जिथे नमाज अदा केली जाते, त्याच्या जवळच वजू करण्याची जागा आहे. ज्यासाठी एक छोटा तलाव करण्यात आला आहे. या तलावात शिवलिंग मिळाल्याची चर्चा आहे. शिवलिंग मिळाल्यानंतर हिंदू बाजू पक्षकार जिल्हा न्यायालयात पोहोचले होते, तेथे त्याचे जतन करण्याचे सांगण्यात आले. ज्या ठिकाणी शिवलिंग सापडले ते सील करावे, असा आदेश बनारस न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने हे आदेश वाराणसी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. ज्या ठिकाणी शिवलिंग सापडले आहे त्या ठिकाणी कोणाच्याही जाण्यावर न्यायालयाने बंदी घातली आहे.
हिंदू याचिकाकर्त्यांचे वकील सुभाष नंदन चतुर्वेदी म्हणाले की, आम्ही कालच आक्षेप नोंदवला होता. वजू करण्यासाठीचे पाण्याची जागेतील पाणी काढून पहायची मागणी केली होती. आज शिवलिंग असल्याचे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. ही गोष्ट बाहेर बोलून किंवा कोर्टात जाऊन आम्ही कोणताही अवमान केलेला नाही. तो तलाव सील करावा, अशी मागणीही आम्ही न्यायालयात केली. कोणीतरी छेडछाड करत असेल असं आम्हाला वाटलं. आम्ही जे केले ते न्यायालयाच्या माध्यमातून केले. मुस्लीम पक्ष न्यायालयात जाण्यास मोकळा आहे.
दुसरीकडे, मुस्लिम पक्षाचे वकील आलोक नाथ यादव यांनी मिडीयाशी बोलताना सांगितले की, “माझ्याकडील आदेशाची प्रत अजून वाचायची आहे. तलाव सील करण्याचा आदेश रद्द करण्यासाठी आम्ही न्यायालयात धाव घेणार आहोत. आम्ही सर्व कायदेशीर कारवाई करू.”
प्रत्यक्षात आज ज्ञानवापी शृंगार गौरी मशिदीच्या तिसऱ्या दिवसाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून उद्या सर्वेक्षणाचा अहवाल न्यायालयात सादर केला जाणार आहे. त्याचवेळी बनारस कोर्टात हिंदू महिलांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाने दावा केला आहे की, मशिदीच्या आवारात तलावात शिवलिंग सापडले आहे. या तलावाचा वापर शुद्धीकरणासाठी केला जात होता, असे वकील सुभाष नंदन चतुर्वेदी यांनी सांगितले. त्याचवेळी ही जागा आता सील करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.