Gujrat Accident: लक्झरी बस-फॉर्च्युनरच्या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू

Accident: जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

0

नवसारी,दि.31: Gujrat Accident: लक्झरी बस-फॉर्च्युनरच्या अपघातात (Bus-Fortuner Accident) 9 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुजरातमधील (Gujrat) नवसारी (Navsari) जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी सकाळी मोठा अपघात झाला. राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी सकाळी फॉर्च्युनर कार आणि लक्झरी बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा SSC HSC Exam 2023: दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर

लक्झरी बस-फॉर्च्युनर अपघात | Luxury Bus-Fortuner Accident

पोलिसांनी घटनास्थळाहून एकमेकांत अडकलेली वाहने बाजुला केली आहेत. तसेच जखमींना बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. प्रवाशांनी भरलेली बस सूरतमधील प्रमुख स्वामी महाराज शताब्दी महोत्सव कार्यक्रमातून परतत होती. यावेळी नवसारी राष्ट्रीय महामार्गावर बसने कारला धडक दिली. चालकाला ह्रदयविकाराचा झटका आल्याने बसवरील नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला. चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण त्याचा मृत्यू झाला.

Gujrat Accident
नवसारी अपघात

कसा झाला अपघात? | Gujrat Accident

मिळालेल्या माहितीनुसार, लक्झरी बस अहमदाबादहून वलसाडला जात होती. ही बस राष्ट्रीय महामार्गावर नवसारी जिल्ह्यातील वेसवान गावाजवळ आली असता विरुद्ध दिशेने येणाऱ्या फॉर्च्युनर कारला धडक बसल्याचे सांगण्यात येत आहे. ही धडक इतकी भीषण होती की, फॉर्च्युनर कार चक्काचूर झाली असून बसच्या पुढील भागाचेही नुकसान झाले आहे.

जाहिरात

गावातील लोक जागे झाले…

मोठमोठ्याने किंचाळणे आणि आरडाओरडा सुरु झाल्याने गावातील लोक जागे झाले आणि घटनास्थळी धावले. यानंतर पोलिसांनाही बोलविण्यात आले व बचावकार्य सुरु झाले. 

9 जणांचा मृत्यू | Navsari Accident

फॉर्च्युनरमध्ये अडकलेल्या व बसमधील जखमींना जवळच्याच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे डॉक्टरांनी 9 जणांना मृत घोषित केले. सर्व मृत कारमधील होते. फॉर्च्यूनर कार डिव्हाडर ओलांडून पलिकडच्या साईडला आली होती. यामुळे समोरून येणाऱ्या बसवर आदळली असे सांगितले जात आहे. 

या अपघातात 32 जण जखमीही झाले आहेत. 32 जखमींपैकी 17 जणांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना अधिक उपचारासाठी वलसाडला रेफर केले. एका जखमीला सुरतला पाठविण्यात आले आहे. अन्य 14 जखमींवर नवसारी येथेच उपचार सुरू आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here