दि.3: गुगल (Google) हे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे हे कोणापासून लपलेले नाही. गुगल आपल्या वापरकर्त्यांना काहीही मुक्तपणे शोधण्याची सुविधा देते. परंतु कमी लोकांना माहित आहे की Google त्याच्या सुरक्षा धोरणाबद्दल खूप सावध आहे आणि ते वेळोवेळी आपली धोरणे बदलतही असते. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहोत, जी जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. वास्तविक, नवीन वर्ष 2022 मध्ये वापरकर्त्यांनी चुकूनही या गोष्टी Google वर कधीही शोधू नयेत. कारण असे केल्याने त्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.
सर्वांनाच ही सवय आहे की, काहीही सर्च करण्यासाठी गुगल ओपन (google search) केलं जातं. पण आपल्याला गुगल जी माहिती देतो, तो कंटेंट गुगल स्वत: बनवत नाही, तर हा केवळ एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. युजर्सच्या सर्चच्या आधारे वेगवेगळ्या वेबसाईट्सच्या लिंक दाखवल्या जातात. त्यामुळे तुम्ही जे काही गुगलवर सर्च करता ते सर्वच योग्य आणि अचूक असेलच असं नाही.
चाइल्ड पॉर्न
वास्तविक, भारत सरकार पोर्नोग्राफीबाबत अत्यंत कडक आहे, विशेषत: चाइल्ड पॉर्नच्या बाबतीत. चाइल्ड पोर्नोग्राफीशी संबंधित केंद्र सरकारच्या धोरणानुसार गुगलवर चाइल्ड पॉर्न सर्च केल्यास तुरुंगात जावे लागू शकते. POSCO कायदा 2012 च्या कलम 14 नुसार, चाइल्ड पॉर्न पाहणे आणि सोशल मीडियावर शेअर करणे हे गुन्ह्याच्या श्रेणीत येते आणि यासाठी कमाल 7 वर्षांची शिक्षा ठेवण्यात आली आहे.
पीडिताची ओळख
छेडछाडीला बळी पडलेल्या तरुणीचे नाव आणि छायाचित्र इंटरनेटवर शेअर करणे देखील गुन्ह्याच्या श्रेणीत येते. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, विनयभंगाच्या पीडितेची ओळख शेअर केली तर शिक्षेची तरतूद आहे. सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे की, जर एखाद्या व्यक्तीने अशा पीडितांचे नाव आणि फोटो प्रिंट, इलेक्ट्रॉनिक किंवा सोशल मीडियाच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर शेअर केले तर त्याला तुरुंगात जावे लागू शकते.
बॉम्ब बनवण्याची पद्धत
सध्या दहशवादी कारवाया वाढल्या आहेत. म्हणून गुगलनेही यासंबंधी कठोर पाऊलं उचलली आहेत. बॉम्ब बनवण्याची पद्धत तुम्ही जर सर्च केली तर तुम्हाला ते महागात पडू शकते.
चित्रपट पायरसी
कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर लीक करणे हे गुन्ह्याच्या श्रेणीत येते. यासोबतच इंटरनेटवरून पायरसी चित्रपट डाऊनलोड करणे हाही गुन्हा मानला जातो. सिनेमॅटोग्राफी ॲक्ट 1952 च्या दुरुस्तीनुसार, चित्रपट पायरसी हा आता गंभीर गुन्हा मानला जाईल आणि असे केल्यास 3 वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे.
कस्टमर केअर
गुगलवर हमखास कस्टमर केअर नंबर हा सर्च केला जातोच. मात्र सायबर क्रिमिनल चुकीचा कस्टमर केअर नंबर देऊन तुमची आवश्यक माहिती चोरी करू शकतात. ही माहिती चोरी केल्यानंतर तुम्हाला आर्थिक फटका बसण्याची शक्यता अधिक असते.
बँक ऑनलाईन वेबसाईट
बँकेची ऑनलाईन बँकिंग वेबसाईट गुगलवर सर्च करू नका. ऑफिशियल वेबसाईटऐवजी, बँकेचा लॉगइन पासवर्ड एखाद्या फेक वेबसाईटवर चुकून टाकला जाऊ शकतो. ज्यामुळे हॅकर्स तुमच्या डिटेल्सचा चुकीचा फायदा घेऊ शकतात.
Apps किंवा सॉफ्टवेअर
मोबाईल Apps आणि सॉफ्टवेअर अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. अनेकदा सायबर क्रिमिनल फेक Apps आणि सॉफ्टवेअर गुगल सर्चमध्ये टाकत असतात. तुम्ही जर ते डाऊनलोड केलं तर त्यातून ते तुमची पर्सनल माहिती चोरी करू शकतात.
शॉपिंग ऑफर्स
गुगलवर ऑनलाइन शॉपिंग ऑफर्स संबंधी सर्च करणे महागात पडू शकते. कारण, गुगलवर अनेक फेक वेबसाइट्स तुम्हाला मिळतील. ज्यावर ऑफर्सच्या आडून तुम्ही सायबर गुन्हेगाराच्या तावडीत सापडू शकता.