Gangubai Kathiawadi Trailer: गंगूबाई काठीयावाडीचा ट्रेलर रिलीज, “आ गई गंगूबाई तोड़ने मर्दों का गुरूर”

0

Gangubai Kathiawadi Trailer: अखेर आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’चे चाहत्यांना ट्रेलर पाहायला मिळाला. बऱ्याच दिवसांपासून संजय लीला भन्साळीच्या या चित्रपटाची प्रतीक्षा होती आणि आता त्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ‘गंगुबाई काठियावाडी’बद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह असून, आता त्याचा ट्रेलर रिलीज झाला असून, त्याला भरभरून प्रेमही मिळत आहे.

संजय लीला भन्साळी यांचा ‘गंगूबाई काठीयावाडी’चा’ हा चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संजय लीला भन्साळी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. तो पाहिल्यानंतर अभिनेत्री आलिया भट्टवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार आलियाच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत. ‘गंगूबाई काठीयावाडी’ चा टीझर पाहून अक्षय कुमार, रणवीर सिंह पासून शाहिद कपूरपर्यंत अनेक मोठंमोठ्या कलाकारांनी आलियाचं कौतुक केलंय.

कसा आहे चित्रपटाचा ट्रेलर?

आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाकडून अनेक अपेक्षा ठेवल्या जात आहेत. यावेळी आलिया भट्ट मोठ्या पडद्यावर तुफान गाजणार असल्याचे ट्रेलरवरूनच स्पष्ट झाले आहे. ट्रेलरमध्ये एका निरागस मुलीपासून रेड लाईट एरियाची राणी बनण्यापर्यंतचा गंगूबाईचा प्रवास दाखवण्यात आला आहे. आलिया भट्टचा असा लूक तुम्ही याआधी पाहिला नसेल.

ट्रेलरमध्ये आलिया भट्टचा जबरदस्त अवतार पाहायला मिळत आहे. आलिया भट्ट यावेळी मोठ्या पडद्यावर तुफान धुमाकूळ घालणार असल्याचे ट्रेलरवरूनच स्पष्ट झाले आहे. आलियाच्या करिअरसाठी हा सर्वात महत्त्वाचा चित्रपट असून यावेळी ती कोणतीही कसर सोडणार नाही. ट्रेलरमध्ये विजय राज देखील एका वेगळ्या अवतारात दिसत आहेत. अजय देवगण लालाच्या भूमिकेत चमत्कार करायला तयार आहे.

या चित्रपटात हे स्टार्स दिसणार

संजय लीला भन्साळी यांचा ‘गंगुबाई काठियावाडी’ ही एका तरुणीची कथा आहे जिला तरुण वयात वेश्याव्यवसायासाठी विकले जाते. यानंतर ती माफिया डॉन आणि वेश्यागृहाची मालकिन बनते. या चित्रपटात आलिया भट्टसोबत टीव्ही अभिनेता शंतनू माहेश्वरी काम करत आहे. याशिवाय विजय राज, अजय देवगण, सीमा पाहवा, जिम सरभ हे देखील या चित्रपटात दिसणार आहेत.

हा चित्रपट वादात सापडला

‘गंगुबाई काठियावाडी’ 25 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी दोन वर्षांहून अधिक काळ लागला. या चित्रपटाने विरोधापासून ते कोरोनापर्यंत अनेक गोष्टींचा सामना केला आहे. खऱ्या गंगूबाईच्या मुलांनी ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटावरही गुन्हा दाखल केला होता, कुटुंबाचा दर्जा बिघडवण्याचा आरोप करत तो बंद करण्याची मागणी केली होती. तथापि, भन्साळी यांनी स्पष्ट केले होते की, त्यांचा चित्रपट लेखक हुसैन झैदी यांच्या माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकातीलवर प्रेरित असून तो चुकीचा नाही.

आदिती राव हैदरी, मौनी रॉय, करिश्मा तन्ना, रणवीर सिंह, शाहिद कपूर, अक्षय कुमार, अंशुला कपूर, नेहा धूपिया आणि दिया मिर्झा अशा तमाम बॉलिवूड कलाकारांनी आलियाने साकारलेल्या गंगुबाईच्या भूमिकेचं उघड कौतुक केलं आहे. इतकंच नाही, तर इन्स्टाग्रामपासून ट्विटरपर्यंत आलिया भट्ट आणि ‘गंगूबाई काठीयावाडी’ हे हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. चित्रपटाचा टीझर रिलीज केल्यावर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख व पोस्टरदेखील रिलीज करण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here