पंढरपूर,दि.6: नुकताच मुंबईतील आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्याच्या मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी पार पडला. सर्वप्रथम नुतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन. पण त्याचसोबत ज्यांच्या मतांच्या जोरावर महायुती सत्तेवर आली त्या समाजातील म्हणजेच धनगर, मुस्लिम, ओबीसी, आदिवासी या प्रवर्गातील एकाही व्यक्तीला उपमुख्यमंत्री पदाची संधी मिळाली नाही ही खंत मात्र प्रचंड प्रमाणात सलतेय.
महायुतीचे नेते व दिल्लीतील नेते मंडळी राजकारणाच्या सारीपाटात एससी, ओबीसी व एसटी समाजाच्या नेत्यांचा फक्त प्यादं म्हणून वापर करून घेतात हे स्पष्ट झालंय. अशी भावना पंढरपुरातील आदिवासी कोळी जमातीचे नेते गणेश अंकुशराव यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.
एससी, एसटी, ओबीसी या वर्गाची मतं घेता आणि राज्यातलं प्रमुख तीन पदांपैकी एकही प्रमुख पद त्या समाजाला देत नाही ? एसटी, एसटी, ओबीसी या प्रवर्गातील 70 टक्के मतदान या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे याचा फक्त तुमच्या सत्ताकारणासाठी वापर करून घेता? नुसतं भाषणामध्ये ओबीसी, एसटी, एसटी या समाजाने सहकार्य केलं असं बोलता आणि प्रत्यक्षामध्ये त्या समाजाला कुठेही संधी देताना दिसत नाही? अशा मुख्य पदावर तुम्ही संधी दिली असती तर बहुजन समाजाला बरं वाटलं असतं. असं परखड मत यावेळी गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केलं आहे.