Fraud Case: बार्शीतील नागरिकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक, शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक

0

बार्शी,दि.१४: शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली आहे. बार्शी शहर व तालुक्यातील अनेक नागरिकांना आमिष दाखवून त्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर येत आहे. या प्रकरणाची कुणकुण लागल्यानंतर बार्शी पोलीस निरीक्षकांना तीन महिन्यांपूर्वीच याची कल्पना आपण दिली होती, अशी माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली. फसवणूक झालेल्यांनी निर्भीडपणे समोर येऊन पोलिसांत तक्रार द्यावी, आपण निश्चितपणेच पाठीशी राहु, असेही राऊत म्हणाले.

या प्रकरणात एकूण ५ कोटी ६३ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली असून पोलिसांनी ५ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सोलापूरचे अप्पर पोलीस अधीक्षक हिंमतराव जाधव यांनी माहिती दिली आहे.

बार्शी शहरातील उच्च शिक्षित गुंतवणूकदारांना आलका शेअर्स सर्व्हिसेस या कंपनीच्या माध्यमातून आकर्षक व्याजाच्या परताव्याचे आमिष दाखवत ही फसवणूक करण्यात आली आहे.

सदरची फर्म ही विशाल अंबादास फटे आणि त्याच्या परिवारातील सदस्य राधिका विशाल फटे, रामदास गणपती फटे, वैभव अंबादास फटे आणि अलका अंबादास फटे सर्वजण चालवत होते. या फसवणूक प्रकरणी फटे परिवार (रा.उपळाई रोड बार्शी) यांच्या विरोधात भा.द. वि.कलम ४२० , ४०९, ४१७ , ३४ आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय हितसंबंधांचे संरक्षण अधीनियम १९९९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फसवणूक झालेल्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. अशा स्थितीत पोलिसांनी सौजन्यपूर्वक वागणूक देऊन या तक्रारी घ्याव्यात. करणाऱ्यांच्या तक्रार लोकप्रतिनिधी पाठीशी नात्याने या निश्चितपणे आपण उभे राहू. दरम्यान, कुणकुण या गुंतवणूकप्रकरणी लागल्यानंतर आपण स्वत : पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांना भ्रमणध्वनीवरून कल्पना दिली होती. यासंबंधी गोपनीय पध्दतीने योग्यप्रकारे माहिती घ्यावी, असेही सांगितले होते, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. वास्तविक पोलीस यंत्रणेमार्फत याची शहानिशा केली असती तर फसवणूक करणारा समोर आला असता व पुढच्या काळात फसवणूक होण्यापासून काहीजण वाचले असते, असेही राऊत म्हणाले. आता पोलिसांनी झालेल्यांना तक्रार फसवणूक देण्यासाठी आवाहन करावे, असेही राऊत म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here