मारहाण करून विनयभंग केल्याप्रकरणी चौघांना अटकपूर्व जामीन मंजूर

0

सोलापूर,दि.११: काठीने मारहाण करून विनयभंग केल्याप्रकरणी न्यायालयाने चौघांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. यात हकिकत अशी की, फिर्यादी रा. कासेगांव, ता. दक्षिण सोलापूर, यांनी दिनांक २६.१२.२०२१ रोजी तालुका पोलिस स्टेशन, सोलापूर येथे अशी फिर्याद दिली की, आरोपी कलावती राजकुमार हब्बु, वर्षा खंडु हब्बु, सविता महादेव हब्बु व कविता श्रीकांत हब्बु, सर्व रा. कासेगांव, ता. दक्षिण सोलापूर व इतर आरोपी यांनी दिनांक २५.१२.२०२१ रोजी त्यांच्यावर दगड व काठीने हल्ला करून, जबर मारहाण करून, विनयभंग केल्याप्रकरणी फिर्याद दिली.

त्यामुळे अटक होण्याच्या भितीपोटी वरील आरोपींनी ॲड. अभिजीत इटकर यांच्यामार्फत सत्र न्यायाधिश सोलापूर यांच्याकडे अटकपूर्व जामीनाचा अर्ज दाखल केला. सदर अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी अड. अभिजीत इटकर यानी असा युक्तिवाद केला की, सदर मारहाण ही विनयभंग करण्याच्या उद्देशाने झालेली नसून, सदर गावातील राजकारणापोटी व राजकीय सुडबुध्दीने सदर आरोपींना सदर खोट्या केसमध्ये गुंतविण्यात आलेले आहे.

सदर युक्तिवाद गाह्य धरून सत्र न्यायाधिश, सोलापूर यांनी सदर आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केला. यात आरोपीतर्फे ॲड. अभिजीत इटकर, ॲड. संजय सुरवसे, ॲड. राम शिंदे, ॲड. संतोष आवळे यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here