शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांची निर्दोष मुक्तता

0

सरकारी कामात अडथळा केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

सोलापूर,दि.3: उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे येथील मंडळ अधिकाऱ्यांना धक्काबुक्की व मारहाण करुन सरकारी कामात अडथळा केल्याच्या आरोपातून शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांची निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. शिंदे यांनी दिला.

राजकीय द्वेषातून लक्ष्मीकांत ठोगें पाटील यांना याप्रकरणात गोवण्यात आल्याची चर्चा होती. लक्ष्मीकांत ठोगें पाटील यांचे वाढते राजकीय वर्चस्व कमी करण्यासाठी स्वपक्षातील नेत्यांनीच त्यांना टार्गेट केल्याची चर्चा होती. लक्ष्मीकांत ठोगें पाटील यांची जनमानसातील प्रतिमा खराब करण्यासाठी स्वपक्षातील नितेश संधीची वाट पाहत असल्याची चर्चा होती.

महसूल खात्यातील एका निर्णयासंदर्भात निकाल देण्याकरिता अनुचित प्रभाव टाकून मोबाइलद्वारे मंडळ अधिकाऱ्यास शिवीगाळ केली. याशिवाय उत्तर तहसील कार्यालयाच्या आवारात त्यांना वोलावून घेऊन धक्काबुक्की, मारहाण केल्याप्रकरणी ठोंगे- पाटील यांच्याविरुध्द 11 नोव्हेंबर 2014 रोजी सदर बझार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

त्यानुसार पोलिसांनी चौकशी करून दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची चौकशी अतिरिक्त सत्र न्यायाधीश शिंदे यांच्यासमोर झाली. आरोपीच्यावतीने बचाव करताना सर्व आरोप खोटे असून सरकारपक्षाने कोणताही सवळ पुरावा दिला नाही. साक्षी विसंगत आहेत. याशिवाय फिर्यादी आणि इतर पूरक साक्षीदार यांचा उलट तपास महत्वपूर्ण व निर्णायक ठरला.

याशिवाय आरोपीच्या वकिलांनी उच्च व सर्वोच्च न्यायालयातील वैशिष्ट्यपूर्ण व पूरक न्यायनिवाडे सादर केले. न्यायालयाने ठोंगे पाटील यांची निर्दोष मुक्तता केली. यात सरकारतर्फे ॲड. गंगाधर रामपुरे तर आरोपीतर्फे ॲड. अभिजित इटकर, ॲड. सुरेश गायकवाड, यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here