Rajan Patil Joined BJP: माजी आमदार राजन पाटील यांचा भाजपात प्रवेश 

0
Rajan Patil Joined BJP: माजी आमदार राजन पाटील यांचा भाजपात प्रवेश

सोलापूर,दि.२९: Former MLA Rajan Patil Joined BJP: माजी आमदार राजन पाटील (Former MLA Rajan Patil) यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. राजन पाटील हे राष्ट्रवादीचे (अजित पवार गट)  नेते होते. त्यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा देत भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. माजी आमदार दिलीप माने हे देखील भाजपात प्रवेश करणार होते मात्र त्यांना सोलापूर दक्षिण भाजपकडून विरोध करण्यात आल्याने त्यांचा पक्षप्रवेश होऊ शकला नाही. 

आज (दि.२९) मुंबई येथे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालयात माजी आमदार राजन पाटील यांनी भाजपात पक्षप्रवेश केला. माजी आमदार यशवंत माने, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील, सोलापूर सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनीही भाजपात प्रवेश केला. 

माजी आमदार राजन पाटील, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण…

यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची प्रमुख उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी सोलापूर जिल्हातील सर्व प्रमुख पदाधिकारी व मोहोळ विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here