माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर

0

मुंबई,दि.4: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. अनिल देशमुख यांना थोडा दिलासा मिळाला असून त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. ईडीच्या गुन्ह्यातून त्यांना जामीन दिला आहे. परंतु सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्ह्यात मात्र त्यांना जामीन मिळालेला नाही. त्यामुळे त्यांना आताही तुरूंगात राहावं लागणार आहे.

नुकतेच सर्वोच्च न्यायालयानंअनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर आठवड्याभरात सुनावणी घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाला दिले होते. सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंनी आपल्या बाजू न्यायालयासमोर मांडल्या. अनिल देशमुख यांचं वय ७२ वर्षे आहे आणि त्यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करण्यात यावा असं अनिल देशमुख यांचे वकील विक्रम चौधरी आणि अनिकेत निकम यांनी न्यायालयामोर सांगितलं. दरम्यान, त्यांना आता १ लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. 

पदाचा गैरवापर आणि मनी लॉंड्रिंग प्रकरणी माजी गृहमंत्री यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. हा जामीन त्यांना ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात मिळाला आहे.

अनिल देशमुख यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांच्या नागपुरातील घरी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. अनिल देशमुख यांना जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्यमेव जयते असं म्हणत या निर्णयाचे स्वागत केलं आहे. आम्हच्या इतर नेत्यांसाठी लढत राहू असंही त्या म्हणाल्या. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here