महेंद्रसिंग धोनी आयपीएल फायनल जिंकल्यानंतर पहिल्यांदाच मैदानात इमोशनल झाला

0

दि.16: चेन्नई सुपर किंग्सने (CSK) एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात आणखी एक आयपीएल ट्रॉफी (IPL Champion)) पटकावली आहे. आयपीएल 2021 च्या फायनलमध्ये चेन्नईने कोलकात्याचा 27 रनने पराभव केला. चेन्नईने दिलेल्या 193 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 165 रनपर्यंतच मजल मारता आली. चेन्नई सुपर किंग्सने चौथ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. आयपीएलमध्ये 9 वेळा चेन्नईची टीम फायनलमध्ये पोहोचली.

चौथ्यांदा आयपीएल ट्रॉफी मिळाल्यानंतर चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी इमोशनल झाला. मॅच संपल्यानंतर मैदानातच धोनीने पत्नी साक्षीला (Sakshi Dhoni) मिठी मारली. यावेळी मैदानात दोघांची मुलगी झिवाही होती. आयपीएलच्या मागच्या मोसमात चेन्नईची कामगिरी निराशाजनक झाली होती. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईला प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळाला नव्हता.

केकेआरचा कर्णधार इयन मॉर्गन याने या सामन्यात टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला, पण हा निर्णय त्यांना चांगलाच महागात पडला. फाफ डुप्लेसिसने 86 रनची खेळी केली. तर मोईन अली 37 रनवर नाबाद राहिला. ऋतुराज गायकवाडने 32 आणि रॉबिन उथप्पाने 31 रन केले. केकेआरकडून सुनिल नारायणने 2 आणि शिवम मावीने 1 विकेट घेतली.

केकेआरचे ओपनर व्यंकटेश अय्यर आणि शुभमन गिल यांनी चेन्नईच्या आव्हानाचा पाठलाग करताना धमाकेदार सुरुवात केली. या दोघांनी 8.1 ओव्हरमध्ये 61 रनची पार्टनरशीप केली. शुभमन गिलने 51 रन आणि व्यंकटेश अय्यरने 50 रन केले. यानंतर मात्र केकेआरची बॅटिंग गडगडली. 34 रनवरच कोलकात्याने 8 विकेट गमावल्या. शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर जॉस हेजलवूड आणि रवींद्र जडेजाला प्रत्येकी 2-2 विकेट घेण्यात यश आलं. दीपक चहर आणि ड्वॅन ब्राव्होने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here