दि.18: चित्रपट निर्माता करण जोहरने (Karan Johar) जुग जुग जीयो (Jug Jugg Jeeyo) चित्रपटाचा BTS Video शेअर केला आहे. चित्रपट ‘जुग जुग जीयो’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र हा चित्रपट प्रदर्शनाच्या आधीच सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. कॉमेडी, रोमँटीक आणि फॅमिली ड्रामा असलेला हा चित्रपट येत्या 24 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच मेकर्सनी या चित्रपटाचा BTS (Behind The Scenes) व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अनिल कपूर टॉवेल डान्स करताना दिसत आहेत.
निर्माता करण जोहरनं (Karan Johar) त्याच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, “जेव्हा तुम्ही एन्जॉय करत असता तेव्हा वेळ कसा निघून जातो हे समजत नाही असं म्हटलं जातं आणि सेटवर असंच एन्जॉय केल्यानंतर आता ‘जुग जुग जीयो’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.”
सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral) झालेल्या या व्हिडीओमध्ये कियारा आडवाणीनं अनिल कपूर (Anil Kapur) यांना ‘जुग जुग जीयो’च्या कुटुंबातील सर्वांत मजेदार व्यक्ती म्हटलं आहे. कारण ते या व्हिडीओमध्ये टॉवेलमध्ये दिसत आहेत आणि ते टॉवेलवरच डान्स करताना दिसत आहेत. या संपूर्ण व्हिडीओमध्ये चित्रपटाची संपूर्ण टीम धम्माल मस्ती करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये सेटवरील पडद्यामागच्या गंमती जमती दाखवण्यात आल्या आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे.