अंबाजोगाई-लातूर महामार्गावर कारचा भीषण अपघात, 3 जणांचा मृत्यू

Ambajogai-Latur Highway Accident: अंबाजोगाई-लातूर महामार्गावर कारचा भीषण अपघात

0

बीड,दि.22: अंबाजोगाई-लातूर महामार्गावर (Ambajogai-Latur Highway) कारचा भीषण अपघात (Accident) झाला असून यात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. बीड जिल्ह्यातून अपघाताची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. अंबाजोगाई-लातूर महामार्गावर कार आणि ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर पोखरी फाटा इथं आणखी एक अपघाताची घटना घडली असून 5 जण जखमी झाले आहे. (Ambajogai-Latur Highway Accident)

अपघातात 3 जणांचा मृत्यू | Ambajogai-Latur Highway Accident

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई-लातूर महामार्गावर (Ambajogai-Latur Highway Accident) अपघाताची मालिका थांबायचं नाव घेत नाही. रात्री झालेल्या दोन अपघातात तिघांचा मृत्यू आणि पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. बर्दापूरजवळ रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या उसाच्या ट्रॅक्टरवर भरधाव कार आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये कारचा चुराडा झाला. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे.

Ambajogai-Latur Highway Accident

ऊसाच्या ट्रॅक्टरला रिफलेक्टर नसल्याने?

अपघातात मृत पावलेले तिघेही रेणापूर येथील आहेत. बबन प्रभू राठोड (वय 45, बिटरगाव, ता. रेणापूर), नंदू माणिक राठोड (वय 33, बिटरगाव, ता. रेणापूर), राहुल सुधाकर मुंडे (वय 31, वंजारवाडी, ता. रेणापूर) अशी तिघा मयतांची नाव आहे. हे दोन्ही अपघात एकाच रस्त्यावर एक तासाच्या फरकांनी झाले असून ऊसाच्या ट्रॅक्टरला रिफलेक्टर नसल्याने हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

दुसऱ्या अपघातात 5 जखमी

तर, दुसरा अपघात महामार्गावरिल पोखरी फाटा येथे टेम्पो, कार आणि ऊसाच्या ट्रॅक्टरचा अपघात झाला. या अपघातात पाच जण जखमी झाले त्यांच्यावर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here