पुन्हा फडणवीस-पवार असे समीकरण कधी बनू शकते का या प्रश्नावर अजित पवार म्हणाले…

0

मुंबई,दि.९: पुन्हा फडणवीस-पवार असे समीकरण कधी बनू शकते का या प्रश्नावर अजित पवार यांनी स्पष्टपणे उत्तर दिले आहे. मी जेव्हा राजकारणात आलो तेव्हा मी मागे थांबणारा कार्यकर्ता होतो. हळूहळू आम्हाला संधी मिळत गेली. पक्षाचा एखादा कार्यक्रम असेल, बैठका असेल तर आम्ही सगळे त्यात सहभागी असतो. जर इमारतीचे उद्घाटन किंवा अन्य कार्यक्रम असतील तेव्हा मी एका कार्यक्रमाला जातो. पवार दुसऱ्या कार्यक्रमाला जातात. आज जो पक्ष उभा आहे तो त्यांच्यामुळेच आहे, असा अजित पवार नाराज असल्याच्या वृत्तांवर खुलासा केला.

एबीपीवर अजित पवारांची मुलाखत झाली. यामध्ये त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. आपण आपले काम करत रहायचे. बोलणाऱ्यामुळे काय भोके पडत नाहीत. कदाचित देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार बनविले होते, त्यावरून माझ्यावर लोक संशय घेत असतील. काही गैरसमज निर्माणासाठी बोलत असतात. ते पहाटेचे सरकार नव्हते, ते सकाळचे सरकार होते. मी पाच, चार वाजता पहाट म्हणतो, असेही पवार म्हणाले.  

यावर पुन्हा फडणवीस-अजित पवार असे समीकरण कधी बनू शकते का या प्रश्नावर अजित पवारांनी संकेत दिले आहेत. यावर राजकारणात कधी काय परिस्थिती य़ेईल हे सांगता येत नाही. आज नितीशकुमार पुन्हा भाजपाला सोडतील, लालूंच्या मुलांसोबत जातील असे वाटले होते का. काँग्रेस- राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येतील असे वाटले होते का, नाही त्यामुळे कधीही काहीही होऊ शकते, असे संकेत पवार यांनी दिले. 

२०१४ मध्ये अजित पवारांनी भाजपाला बाहेरून पाठिंबा दिल्याचे स्पष्टपणे सांगितले. शिवसेनेची त्यामुळे बार्गेनिंग पावर कमी झाली. ते बाजुलाच बसले ना, असेही पवार म्हणाले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here