मुंबई,दि.२९: झारखंडमधील स्टील सिटी टाटानगरहून केरळमधील एर्नाकुलमकडे जाणाऱ्या टाटा एर्नाकुलम एक्सप्रेसला आंध्र प्रदेशात अपघात झाला. टाटा एर्नाकुलम एक्सप्रेसच्या दोन डब्यांना आग लागली. दोन डबे जळून खाक झाले आणि एका प्रवाशाचा मृत्यू झाला. आंध्र प्रदेशातील अनकापल्ले येथील यलमंचिलीजवळून ट्रेन जात असताना हा अपघात झाला.
टाटा एर्नाकुलम एक्सप्रेसच्या बी२ आणि एम१ डब्यांमध्ये आग लागली. दोन्ही डबे जळून खाक झाले. आग लागताच ट्रेनमध्ये घबराट पसरली. प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आणि डब्यात एक मृतदेह आढळला. अनकापल्लीचे पोलिस अधीक्षक तुहिन सिन्हा यांनी घटनेची पुष्टी केली. अनकापल्लीचे पोलिस अधीक्षक तुहिन सिन्हा यांनी सांगितले की, एका डब्यात ८२ आणि दुसऱ्या डब्यात ७६ प्रवासी होते.
आग लागल्याची माहिती मिळताच प्रवाशांमध्येही घबराट पसरली आणि प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी रेल्वेमधून बाहेर उडी घेतली. मात्र विजयवाडा येथील रहिवासी चंद्रशेखर सुंदर (वय – 70) हे B1 डब्यात अडकले होते. त्यांना वेळीच बाहेर पडता आले नाही, त्यामुळे त्यांचा होरपळून मृत्यू झाला. पोलीस अधीक्षक (SP) तुहिन सिन्हा यांनी ही माहिती दिली.








