निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना धक्का, ती दोन चिन्हं केली बाद!

0

नवी दिल्ली,दि.10: निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना धक्का दिला आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाने मागणी केलेली दोन चिन्ह बाद केली आहेत. या दोन्ही गटाने त्रिशूळ आणि गदा ही चिन्ह मागितली होती. त्रिशूळाची शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाकडून मागणी करण्यात आली होती. धार्मिक चिन्ह असल्यानं निवडणूक आयोगाने त्रिशूळ आणि गदा ही दोन्ही चिन्ह बाद केली आहेत. त्यामुळे आता उगवता सूर्य आणि मशाल हे दोनच पर्याय आता उपलब्ध आहेत, पण आता उगवता सूर्य हे चिन्हही बाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिंदे गटाला निवडणूक आयोगाकडून नव्याने तीन चिन्ह द्यायला सांगण्यात आली आहेत.

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाची मागणी

ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला त्रिशूळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल ही तीन चिन्ह पाठवण्यात आली, तर शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा तीन नावांचा प्रस्ताव ठेवण्यात आला.

एकनाथ शिंदे गटाकडून सुद्धा उगवता सूर्य, गदा आणि त्रिशूळ ही तीन पक्ष चिन्ह मागण्यात आली होती. बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना बाळासाहेबांची अशी 3 नावं शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे पाठवली आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here