निवडणूक आयोगाची भाजपा आणि अजित पवार गटाला नोटीस 

0

मुंबई,दि.8: निवडणूक आयोगाने भाजपा आणि अजित पवार गटाला नोटीस पाठवली आहे. राज्यात काल (दि.7) लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. आता चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील निवडणुकांसाठी प्रचारसभा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, भाजपा आणि अजित पवार गटाला निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे.  

निवडणूक आयोगाने प्रचारसभांमध्ये मतदारांना प्रलोभन दाखवणारी विधाने केल्याप्रकरणी भाजपा आणि अजित पवार गटाला नोटीस बजावली आहे. शरद पवार गटाचे ॲड. प्रांजल अगरवाल यांनी याबाबत तक्रारी केल्या आहेत.

बारामती तसेच इतर मतदारसंघांमध्ये भाषणे करताना मतदान केल्यास शासकीय तिजोरीतून सढळ हाताने निधी वितरित करण्यात येईल, अशा स्वरूपाचे विधान नेत्यांकडून करण्यात येत असल्यामुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत, असे राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी भाजपचे  प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अजित पवार यांना बजावलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.

अजित पवार हे अनेकदा आपल्या भाषणामध्ये मतदारांना विविध आश्वासने देताना दिसत आहेत. त्याचबरोबर मतं द्या, निधी देतो. अशा आशयाची आश्वासनं दिली जात आहेत. मत दिल्यास शासकीय निधी दिला जाईल अशी आश्वासने वारंवार दिली जात असल्याचा आरोप निवडणूक आयोगाने केला आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here