शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

0

मुंबई,दि.27: माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आज वाढदिवस आहे. उद्धव ठाकरे यांच आज 62 वा वाढदिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

विशेष म्हणजे या पोस्टमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केवळ माजी मुख्यमंत्री असा केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख करणं एकनाथ शिंदे यांनी टाळलं आहे. एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी आई जगदंबेचरणी प्रार्थना असे म्हणून त्यांचे अभिष्टचिंतन केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करताना शिवसेना पक्षप्रमुख म्हणणं टाळलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी जरी उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्षप्रमुख म्हणणं टाळलं असलं तरी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या अनेक बंडखोर नेत्यांनी मात्र उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देताना त्यांचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख असा केला आहे. माजी मंत्री गुलाबराव पाटील, शिवाजी आढळराव पाटील, धैर्यशील माने यांच्यासह काही बंडखोर नेत्यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देताना त्यांच्या नावाआधी शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख केला आहे.

हारतुरे, पुष्पगुच्छ नको, फक्त शुभेच्छा द्या; उद्धव ठाकरे यांचं आवाहन

शिवसैनिकांच्या प्रेमापोटी उद्धव ठाकरे हे सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत. पण फक्त शुभेच्छा द्या, हारतुरे नको, पुष्पगुच्छ आणि फोटोफ्रेम्स नको, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here