मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक झटका?

0

मुंबई,दि.14: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आणखी एक झटका देण्याची तयारी केली आहे. झी24 ने याबाबत वृत्त दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 40 आमदार सोबत घेऊन राज्यात सत्तांतर घडवून आणले. त्यानंतर ठाणे, कल्याण डोंबिवली महापालिकेतील नगरसेवकही शिंदे गटात सामिल झाले. शिवसेनेचे अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

शिवसेना खासदारांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाल्याची माहिती आहे. काल रात्री मुख्यमंत्री निवासस्थानी ही बैठक झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, दोन तृतीयांश खासदारांचा गट तयार करण्याच्या तयारीत एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ते उद्धव ठाकरे यांना आणखी एक झटका देण्याची सूत्रांची माहिती आहे.

याआधी शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड करत आपल्या सोबत सूरतला 20 आमदारांचा गट सोबत नेला होता. यात अपक्ष आमदारही सहभागी होते. त्यानंतर हा आकडा 30 पर्यंत गेला. त्यानंतर ते आसाममधील गुवाहाटीत गेले. त्यानंतर शिंदे गटात शिवसेनेचा एक एक आमदार दाखल होत हा आकडा 39 वर गेला. शिवसेनेतील एकतृतियांश आमदार फुटल्याने शिवसेनेला मोठा हादरा बसला. आता शिंदे गटासोबत शिवसेनेचे 40 आणि अपक्ष असे 50 आमदार आहेत.

शिवसेना खासदारांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. काल रात्री मुख्यमंत्री निवासस्थानी बैठक झाल्याचे समोर आले आहे. आमदारांप्रमाणेच शिंदे गट दोन तृतीयांश खासदारांचा गट तयार करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आमदार, नगरसेवकांनंतर उद्धव ठाकरेंना शिंदे आणखी एक झटका देण्याच्या तयारीत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here