शिवसेना खासदारांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास, शिवसेनेला आणखी एक धक्का

0

नवी दिल्ली,दि.19: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे शिवसेनेला धक्क्यावर धक्के देत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेक नगरसेवक शिंदे गटात सामिल झाले आहेत. शिवसेनेच्या खासदारांनीही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिंदे गटात सामिल होण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आता दिल्लीतही पक्षाला मोठा हादरा बसला आहे. शिवसेनेच्या 12 खासदारांनी वेगळी भूमिका घेत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेनेच्या लोकसभेतील 12 खासदारांसह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीतील महाराष्ट्र सदनात पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी खासदार राहुल शेवाळे यांची शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते म्हणून केली. तसंच खासदार भावना गवळी मुख्य प्रतोद असल्याचंही ते म्हणाले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना 12 खासदारांनी याबाबतचं पत्र दिलं असल्याचीही माहिती शिंदे यांनी यावेळी दिली. 

“जी आम्ही महाराष्ट्रात बाळासाहेबांच्या विचाराची भूमिका घेतली. तिच भूमिका दिल्लीत हे खासदार घेत आहेत. याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो. जनतेच्या मनातलं सरकार आम्ही राज्यात स्थापन केलं आहे आणि याचं स्वागत या 12 खासदारांनीही केलं आहे. उद्या ओबीसी आरक्षणासंदर्भातील केस कोर्टात आहे. त्या कामासाठी मी इथं आलो होतो. त्यासोबतच या खासदारांचं स्वागतही करण्यासाठी इथं आलो आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here