मुंबई,दि.19: Eknath Shinde On PM Modi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. आज मुंबईमध्ये मेट्रोचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील विकासकामांचा पाढा मोदींसमोर वाचला. तसेच मोदींवर देखील स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. यावेळी त्यांनी दावोसमध्ये घडलेला एक प्रसंग सांगत मोदींची स्तुती केली.
मोदींचीच हवा… | Eknath Shinde On PM Modi
यावेळी त्यांनी दावोसमध्ये घडलेला एक प्रसंग सांगत मोदींची स्तुती केली. जागतिक आर्थिक परिषदेसाठी दावोसमध्ये गेलो होतो, त्या ठिकाणीही मोदींचीच हवा होती, अनेक देशाच्या पंतप्रधानांनी फक्त मोदींबद्दलच विचारलं असं मुख्यमत्री शिंदे म्हणाले. दावोसमध्येही मोदींचे भक्त असल्याचं मला जाणवलं असंही ते म्हणाले. येत्या काळात मोदींच्या नेतृत्वाखाली मुंबईचा चेहरामोहरा बदलून टाकणार असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मुंबईतील अंधेरी-दहिसर मेट्रो आणि विविध विकासकामांच्या उद्धाटनासाठी नरेंद्र मोदी आज मुंबईत आले आहेत. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
…मी त्यांचाच माणूस आहे | Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसमधील आर्थिक परिषदेसाठी गेले होते. त्यावेळी आलेला अनुभव त्यांनी सांगितला. मुख्यमंत्री म्हणाले की, “दावोसमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी अनेक देशांचे पंतप्रधान भेटले, अधिकारी भेटले. त्या ठिकाणीही मोदींचे भक्त होते. त्यांनी मला विचारलं की तुम्ही मोदींसोबत आहात का? त्यावेळी मी म्हणालो की मी त्यांचाच माणूस आहे.”
आम्हाला संधी मिळाली ती केवळ नरेंद्र मोदींच्यामुळे…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राचा विकास किती झाला ते आपल्याला माहिती आहे. अगदी ठप्प झालेल्या कामांना चालना देण्यासाठी आणि लोकोपयोगी योजनांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्याची संधी आम्हाला मिळाली ती केवळ नरेंद्र मोदींच्यामुळे अशी स्तुतीसुमनं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांवर उधळली. काही लोकांना वाटायचं की या कार्यक्रमाचे उद्धाटन मोदींच्या हातून होऊ नये, पण नियतीसमोर कुणाचं काही चालत नाही.”
मोदींच्या व्यक्तीमत्त्वामध्ये असं काही आहे की जे आपल्याला उर्जा देतं. येत्या दोन अडीच वर्षामध्ये या मुंबईचा कायापालट आपल्याला पाहायला मिळेल असं मुख्यमंत्री म्हणाले. ते म्हणाले की, “2015 मध्ये नरेंद्र मोदी यांनी याच मेट्रोची सुरूवात केली होती. आज त्यांच्या हातातूनच मेट्रोचं उद्धाटन होतंय हा दैवी योग. मी पंतप्रधानांचे त्याबद्दल आभार मानतो. महाराष्ट्राचे लोक त्यामुळे भाग्यवान आहेत. येत्या दोन वर्षात मुंबईचा कायापालट करु.”
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नागपूर-मुंबई महामार्गाची सुरूवात केली, त्यामुळे समृद्धी मुंबईत दाखल झाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांचं नातं वेगळं होतं, त्यांच्यात हिंदुत्व हा समान धागा होता, असं ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांच्या काळात साडेतीनशे किमीच्या मेट्रोच्या जाळ्याची सुरूवात झाली. मधल्या काळात यावर काही काम झालं नाही. आता आमचं सरकार आल्यानंतर त्याला पुन्हा चालना मिळाली. दरवर्षी खड्ड्यात जाणारा मुंबईकरांचा पैसा आम्ही आता वाचवणार असून मुंबईतील चारशे किमीच्या रस्त्यांचं आता काँक्रिटीकरण होणार आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.