Eknath Shinde Dasara Melava: म्हणून मला तुमच्यासमोर डोकं टेकवावं वाटलं: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

मुंबई,दि.५: Eknath Shinde Dasara Melava: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दसरा मेळाव्यात संभाषणास सुरुवात केली आहे. मी नतमस्तक झालो कारण राज्याच्या कानाकोपऱ्यातून एवढा मोठा जनसमुदाय आलाय. काही लोक तर रात्रीच आले. पाचची सभा होती, मात्र अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी आधीच आले होते. म्हणून मला तुमच्यासमोर डोकं टेकवावं वाटलं. असे एकनाथ शिंदे म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती दिली, विचारांना तिलांजली दिली. मग तुम्हाला त्या जागेवर उभा राहण्याचा आणि बोलण्याचा नैतिक अधिकार तरी उरतो का? हजारो शिवसैनिकांनी आपला घाम, रक्त, सांडून जो पक्ष उभा केला तो तुम्ही तुमच्या वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी, महत्त्वकांक्षेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे गहाण टाकला. अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

बाळासाहेबांनी ज्यांच्यावर टीका केली, त्यांच्या दावणीला तुम्ही शिवसेना बांधली, त्यामुळं शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही ही भूमिका घेतली असे एकनाथ शिंदे म्हणाले.

ही गर्दी पाहून खरी शिवसेना कुठं आहे याचं उत्तर उभ्या महाराष्ट्रालाच नाही तर भारताला मिळालं आहे असेही शिंदे म्हणाले.

‘आरएसएसवर बंदीची मागणी हास्यास्पद, आरएसएसचं राष्ट्रउभारणीत महत्वाचं योगदान’ असे एकनाथ शिंदे म्हणाले.

‘राज ठाकरे, नारायण राणे, निहार ठाकरे, स्मिता ठाकरेंसह अनेकजण शिवसेनेतून गेले, याचं उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं’ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यातही पीएफआयला ठेचलं जाईल, PFIबाबत पंतप्रधान मोदी, अमित शाहांची भूमिका योग्यच असे एकनाथ शिंदे म्हणाले.

‘उद्धव ठाकरेंनी वर्क फॉर्म होम केलं, आम्ही वर्क विदाऊट होम केलं, सातच्या आत घरी जाण्याची शिवसैनिकांची संस्कृती नाही’ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here