NCP: एकनाथ खडसे यांची अमित शाह यांच्यासोबत चर्चा, राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण

0

मुंबई,दि.24: NCP: राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची अमित शाह यांच्यासोबत झालेल्या चर्चेवर राष्ट्रवादीकडून (NCP) स्पष्टीकरण देण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली आहे. भाजपामधील अंतर्गत वादाला कंटाळून पक्षातून बाहेर पडलेले एकनाथ खडसे पुन्हा भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेकविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे. मात्र, यातच आता भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या घरवापसीच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना याबाबत माहिती आहे, असा खुलासा करण्यात आला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे हे अमित शहांना भेटणार होते. खडसे एकटे जाणार नव्हते. पवार साहेबांसोबत ते जाणार होते. अजून ती भेट झालेली नाही. त्यामुळे खडसे भाजपमध्ये जाणार, हे जे वृत्त दिले जात आहे ते पूर्णपणे चुकीचे आहे, असे महेश तपासे यांनी सांगितले. 

पुढे बोलताना महेश तपासे म्हणाले की, एकनाथ खडसेंनीही याबाबत खुलासा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर विधानपरिषदेचे पद आणि महाराष्ट्रातल्या पक्षाच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या खडसे यांच्याकडे देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे हा विषय चुकीचा आहे अशी काही परिस्थिती नाही, असे महेश तपासे यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, दसरा मेळावा हा मूळचा शिवसेनेचा आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून दसरा मेळावा घेण्याची परंपरा ठाकरेंची आणि शिवसेनेची आहे. पण वाद निर्माण करून एक वेगळ्या पद्धतीचा दसरा मेळावा घेण्याचा प्रयत्न आहे. एवढ्या विकोपाला राजकारण जाता कामा नये. महाराष्ट्राच्या ते हिताचं नाही. जनावरांमधील लंपीचा आजार, पुराची स्थिती, शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी लक्ष घालावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here