Eknath Khadse: आपल्या बापाला विसरणाऱ्यांची संख्या या जगामध्ये कमी नाही: एकनाथ खडसे

0

जळगाव,दि.20: Eknath Khadse On Girish Mahajan: राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपा नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर टीका केली आहे. एकनाथ खडसे हे भाजपावर जोरदार हल्लाबोल करताना अनेकवेळा दिसून येतात. भाजपमध्ये 40 वर्षे हमाली केली. उभं आयुष्य पक्षासाठी खर्ची घातलं. मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचलो आणि त्याचवेळी माझ्या डोक्यावर देवेंद्र फडणवीस आणून ठेवला, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपावर तोफ डागली होती.

जळगावच्या राजकारणात भाजप नेते गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यात टोकाचा संघर्ष बघायला मिळतोय. गिरीश महाजन यांनी तर थेट “कोण आहेत ते खडसे? मी त्यांना ओळखत नाही”, असं वक्तव्य केलं. त्यांचं हे वक्तव्य खडसे यांच्या मनाला लागलं. त्यातून त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केली. “गिरीश महाजन यांना मी राजकारणात जन्माला घातलं, पण ते आता आपल्याला विसरले”, अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा Car Accident: कारच्या भीषण अपघातात नवरदेवासह एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू



गिरीश महाजन यांनी केली होती टीका

“कोण आहेत ते खडसे? मी त्यांना ओळखत नाही. खडसे यांना काही महत्त्व राहिले नाही. खडसे लोकप्रतिनिधी नाहीत, काही नाहीत. त्यांना घरी बसून काहीतरी बोलावं लागतं म्हणून ते बोलतात. आम्ही काही त्यांच्या बोलण्याला महत्त्व देत नाही”, अशा खोचक शब्दांमध्ये त्यांनी टीका केली.

एकनाथ खडसेंचं प्रत्युत्तर

गिरीश महाजन यांच्या टीकेला एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर दिलं. “आदरणीय गिरीश महाजन हे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांच्या दृष्टीकोनातून मी सर्वसामान्य आहे. ते अनेक राज्यांमध्ये प्राचाराला जाणारे मान्यवर नेते आहेत. मी त्यांना घडवलं आहे ते विसरले. मी त्यांना राजकारणात जन्माला आणलं आहे. पण हे नेहमीचं आहे. आपल्या बापाला विसरणाऱ्यांची संख्या या जगामध्ये कमी नाही. त्यामुळे आख्ख्या जळगाव जिल्हा आणि महाराष्ट्राला माहिती आहे की, त्यांना नेमकं कुणी जन्माला आणलं, कुणी वाढवलं, कुणी मोठं केलं, कुणी त्यांना प्रत्येकवेळी तिकीट देण्यासाठी मदत केली. मी त्यांना सर्वच गोष्टींमध्ये मदत केली”, असं एकनाथ खडसे म्हणाले.

“गिरीश महाजन आता स्वत:च्या बळावर जळगावमध्ये निवडणुकीत यश मिळवून देतील, अशी स्थिती नाही. आताचा अलिकडचा कालखंड पाहिला तर बोदवड नगरपरिषदेत भाजपची सत्ता होती. भाजपचा नगराध्यक्ष आला. त्याठिकाणी शिवसेनेबरोबर चुपी युती केली. भाजप भूईसपाट झाली. भाजपचा एकमेव माणूस निवडून आला तोही चिठ्ठीवरुन निवडून आला. उलट राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नगरसेवक होते ते सात झाले आणि आमचा एक चिठ्ठीमुळे पडला. जिल्ह्यामध्ये जिल्हा बँकेची निवडणूक झाली त्यावेळी गिरीश महाजन यांनी पळ काढला. ते जिल्हा बँकेत एकही माणूस उभे करु शकले नाहीत. वेगवेगळ्या निवडणुकीत तिच परिस्थिती आहे”, अशी टीका खडसेंनी केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here