मुंबई,दि.4: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) समन्स बजावलं आहे. राजधानी मुंबईतील पत्रा चाळ पुनर्विकास प्रकरणी 1 हजार 34 कोटी रुपयांच्या झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) चांगलेच अडचणीत आहेत. न्यायलयाने राऊत यांना पहिली 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. संजय राऊत यांना आज पुन्हा एकदा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांच्या कोठडीत 8 ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे.
पत्राचाळ प्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीचं समन्स बजावले आहे. वर्षा राऊत यांना चौकशीसाठी उद्या सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याआधी जानेवारी महिन्यात वर्षा राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. यावेळी ईडी अधिकाऱ्यांनी त्यांची जवळपास साडेतीन ते चार तास चौकशी करण्यात आली होती.
वर्षा यांच्या बँक खात्यातून अनोळखी व्यक्तीच्या बँक खात्यात पैसे पाठवण्यात आले आहेत. वर्षा राऊत यांच्या बँकेतून 1 कोटी 6 लाख आणि 1 कोटी 8 लाख अनोळखी व्यक्तीच्या बँक खात्यात पाठवण्यात आले आहे. त्यामुळे पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत आणि वर्ष राऊत यांची चौकशी करण्यासाठी ईडीने वर्ष राऊत यांना समन्स पाठवले आहे. वर्षा राऊत यांच्या बँक खात्यातून अनेक व्यवहार झाले असून त्याबाबत ईडीला वर्षा यांची चौकशी करायची आहे.