मुंबई,दि.९: ठाकरे गटाच्या आमदाराच्या घरी ईडीने धाड टाकली आहे. आमदार अपात्र प्रकरणी उद्या (दि.१०) निकाल येणार आहे. अशात आज आमदार रविंद्र वायकर यांच्या घरी सकाळी ईडीच्या पथकाने धाड टाकली आहे. दहा ते बारा ईडीच्या अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे, आर्थिक गैरव्यवहारा संदर्भात ही धाड असल्याचे बोलले जात आहे. आज सकाळी ८.३० च्या सुमारास ईडीच्या पथकाने धाड टाकली आहे.
गेल्या काही दिवसापासून काही अधिकारी आणि नेते कोविड घोटाळ्या प्रकरणी रडारवर होते. जोगेश्वरी भूखंड प्रकरणी ही चौकशी सुरु आहे. रवींद्र वायकर हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळचे म्हणून ओळखले जातात. ठाकरे गटाचे बारा आमदार प्रकरणाचा उद्या निकाल आहे. त्यापूर्वी ईडीची छापे सुरु झाले आहे. रवींद्र वायकर यांच्याकडे यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात छापे पडले होते.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आर्थिक प्रकरणांचा गेल्या काही दिवसापूर्वी पाठपुरावा दिला होता. दरम्यान आता आज वायकर यांच्या निवासस्थानी ईडीने धाड टाकली आहे. सध्या त्यांच्या निवासस्थानी चौकशी सुरू आहे.
ईडी चौकशी प्रकरणी आमदार रविंद्र वायकर यांनी कोर्टातही धाव घेतली होती. ईडीने त्यांना समन्सही पाठवण्यात आले होते. आता ईडीने सकाळीच धाड टाकली असून गेल्या तीन तासांपासून ईडी तपास करत आहे.