हिंगोली,दि.९: हिंगोली जिल्ह्यातील पांगरा (शिंदे) गावात जोराचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. वसमत तालुक्यातील पांगरा (शिंदे) या गावात ८ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजून ४ मिनिटांनी जोराचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. भूकंपाचा आवाज झाला पण नोंद झाली नाही असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि सांगितले.
वसमत तालुक्यात बुधवारी सर्व गाव झोपेत असताना रात्री १२:४ मिनिटांनी भूकंपाचा जोराचा धक्का जाणवला. त्यामुळे सर्व गाव जागा झाला. काही वेळातच सर्व नागरीक रस्त्यावर आले. या भूकंपाचे केंद्र पांगरा शिंदे आहे असे सांगितले जात आहे.
पांगरा गावाबरोबरच कुरुंदा,पार्डी खु, कोठारी, सोमठाणा, राजवाडी,सिरळी, कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव शिंदे पांगरा, वापटी, राजवाडी, आंबा, चोंडी स्टेशन, वरताळा आदी ठिकाणी एकाचवेळी भूकंपाचा धक्का जाणवला आहे. यापूर्वी १५ जुलै रोजी भूकंपाचा धक्का जाणवला होता.