Snapchat GPS लोकेशनमुळे पोलीस पोहचले अल्पवयीन मुलीवर अत्त्याचार करणाऱ्यापर्यंत

0

दि.18: देश विदेशात अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या घटना घडण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. तंत्रज्ञानाच्या युगात अनेकजण स्मार्टफोनचा वापर करतात. अनेकजण सोशल मीडियावर सक्रिय असतात. एका अल्पवयीन अत्त्याचारग्रस्त मुलीची नराधमाच्या तावडीतून सुटका Snapchat मुळे झाली आहे. पोलीस GPS लोकेशनमुळे मुलीपर्यंत पोहचून मुलीची सुटका व नराधमांना पकडू शकले.

एका 14 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तिला ओलीस ठेवण्यात आले, तिला बेदम मारहाण करण्यात आली. यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना जीपीएस (GPS Location) लोकेशनवरून अटक करून मुलीची त्यांच्या तावडीतून सुटका केली.

‘द सन’ आणि ‘डेली मेल’च्या वृत्तानुसार, हे प्रकरण फ्रान्सच्या (France) मार्सेल (Marseille) येथील आहे. आरोपींना गेल्या शुक्रवारी अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी या मुलीला रुग्णालयात दाखल केले आणि तिच्या कुटुंबीयांना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली.

तरुणीच्या मोबाईलचे जीपीएस लोकेशन (GPS Location) आरोपीला पकडण्यासाठी उपयुक्त ठरले. स्नॅपचॅट (Snapchat) जीपीएस लोकेशनमुळे पोलीस घटनास्थळी पोहोचले.

‘सन’च्या रिपोर्टनुसार – 26 वर्षीय तरुणाने तिला आमिष दाखवून बोलावले होते. त्यानंतर ही मुलगी घरातून पळून गेली. या मुलीने गांजाचे सेवन केले होते. त्यानंतर 26 आणि 64 वर्षांच्या नराधमाने मिळून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर या मुलीने पोलिसांसमोर सांगितले की, दोघांनीही तिच्यासोबत ओरल सेक्स केला होता. त्याचवेळी हे सर्व परस्पर संमतीने घडल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले.

मुलीने Instagram वर पाठवला आई वडिलांना मेसेज

पीडित मुलीने आपल्या अपहरणाची माहिती सर्वप्रथम तिच्या पालकांना इंस्टाग्रामवर दिली. हा प्रकार मुलीच्या पालकांनी पोलिसांना सांगितला. यानंतर पोलिसांनी तरुणीला तिच्या मोबाईलमधील स्नॅपचॅट ॲपचे लोकेशन चालू करण्यास सांगितले. पोलिसांच्या सांगण्यावरून तिने स्नॅपचॅट ॲपमध्ये लोकेशन चालू केले. त्यानंतर तरुणी पोलिसांशी मेसेजद्वारे संवाद साधत राहिली. कारण तिला भीती होती की तिने फोन केला तर अपहरणकर्ते सावध होतील.

यादरम्यान पोलीस त्या अपार्टमेंटजवळ पोहोचले जिथून मुलीने तिचे लोकेशन पाठवले होते, पोलीस प्रत्येकाचा दरवाजा ठोठावत होते. मुलगी हजर असलेल्या ठिकाणी पोलिसांनी दरवाजा ठोठावला असता तिने मेसेजवर हो (Yes) टाईप करून माहिती दिली. यादरम्यान पोलिसांनी त्या फ्लॅटमध्ये घुसून दोन्ही आरोपींना पकडले.

पोलिसांना तेथे मुलगी आढळली तेव्हा ती नशेत होती, त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर वैद्यकीय तपासणीत तिच्यावर बलात्कार झाल्याचे उघड झाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here