सोलापूर जिल्ह्यातील या गावातही दुष्काळ जाहीर

0

सोलापूर,दि.11: महाराष्ट्रातील 40 तालुक्यात यापूर्वीच दुष्काळ (Maharashtra Drought) जाहीर करण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही तालुक्यांमध्ये दुष्काळजाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा शासन आदेश (GR) सरकारने जाहीर केला आहे. एकूण 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील 15 जिल्ह्यातील 24 तालुक्यामध्ये गंभीर तर 16 तालुक्यांमध्ये मध्यम दुष्काळ जाहीर झाला आहे.

राज्यातील 40 तालुक्यांमध्ये यापूर्वीच दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. आता राज्यातील उर्वरित तालुक्यांमधील 1021 मंडळामध्येही दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील 46 महसूल मंडळांचा समावेश आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या आपतग्रस्तांना तातडीने मदत देण्यासाठी राज्यातील 40 तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त राज्यातील इतर तालुक्यातील महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत कमी पर्जन्यमान झाले असल्याचे आढळले.

त्यानुसार मंत्रिमंडळ उपसमितीच्या 9 नोव्हेंबरच्या बैठकीमध्ये त्या महसूल मंडळांचा पण दुष्काळी यादीत समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेथेही आता सवलती लागू असतिल. ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी पर्जन्याच्या 75% पेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान 750 मि.मि. पेक्षा कमी झाले आहे, अशा 1021 महसुली मंडळांमधील शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

जिल्ह्यातील ‘या’ मंडळामध्ये दुष्काळ जाहीर 1) उत्तर सोलापूर : शेळगी, तिऱ्हे, मार्डी वडाळा, सोलापूर.
2) दक्षिण सोलापूर : बोरामणी, वळसंग, मंद्रूप, होटगी, मुस्ती, निम्बर्गी, विंचूर.
3) अक्कलकोट : अक्कलकोट, जेऊर, तडवळ, करजनी, दुधनी, मैंदर्गी, वागदरी, चपळगाव, किणी.
4) मोहोळ : मोहोळ, कामती बु, टाकळी सिकंदर, पेनुर, वाघोली, नरखेड, सावळेश्वर, शेटफळ.
5) माढा : मोडनिंब
6) पंढरपूर : पंढरपूर, भंडीशेगाव, भाळवणी, करकंब, पटवर्धनकुरोली, पुळुज, चळे, तुंगत, कासेगाव.
7) मंगळवेढा : बोराळे, मरवडे, आंधळगाव, मारापुर, मंगळवेढा, भोसे, हुलजंती.

‘या’ सवलती होणार लागू
१) जमीन महसूलात सूट. २) पीक कर्जाचे पुनर्गठन. ३) शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती.
४) कृषी पंपाच्या चालू विजबिलात ३३.५% सूट.
५) शालेय/ महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या परिक्षा शुल्कात माफी.
६) ‘रोहयो’ अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता.
७) आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्स.
८) टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here