Doctor Kalpana Nanjkar: फिस्टुला समज-गैरसमज: डॉ. कल्पना नानजकर

Doctor Kalpana Nanjkar: शस्त्रक्रियेच्या साहाय्याने फिस्टुलाच्या आजारावर कायमस्वरूपी उपचार करण्यात येतो

0

Doctor Kalpana Nanjkar: बऱ्याच रुग्णांमध्ये फिस्टुला (Fistula) या आजाराबाबत अनेक गैरसमज आहेत. काहीजण हा मूळव्याधीचाच एक प्रकार आहे, असे समजतात; परंतु मूळव्याध व फिस्टुला हे आजार भिन्न स्वरूपाचे आहेत. (Piles And Fistula Are Different Diseases)

फिस्टुला (Fistula) या आजाराचे विविध प्रकार असतात. या आजारामध्ये नसामध्ये पोकळी निर्माण होऊन त्यामध्ये पू साचतो. हा आजार शरीराच्या कोणत्याही भागामध्ये होऊ शकतो. संडासच्या ठिकाणी होणारा आजार भगंदर’ या नावाने ओळखला जातो.

यामध्ये गुदद्वाराजवळ सूज निर्माण होते व यातून पू किंवा स्राव बाहेर येतो. जास्त करून आहारात ओवट, तिखट पदार्थ खाण्यात आल्यास तसेच अतिजागरण, अतिप्रवास, व्यसन इत्यादीमुळे वारंवार जागा फुगून स्राव बाहेर येतो व बसल्यास त्रास होतो.

लक्षणे- गुदद्वाराच्या बाजूतून पू येणे, दुखणे, वारंवार रक्त येणे, पोट साफ न होणे. तपासणी- या आजारातील तपासणी करणे अतिशय महत्त्वाचे आहे.

उपचार- (१) प्राथमिक अवस्थेत ‘ॲन्टीबायोटिक’च्या साहाय्याने किंवा आयुर्वेदिक औषधाच्या साहाय्याने उपचार केला जातो. (२) शस्त्रक्रियेच्या साहाय्याने फिस्टुलाच्या आजारावर कायमस्वरूपी उपचार करण्यात येतो. (३) यामध्ये भगंदरची पूर्ण नळी काढण्यात येते. जरूरीप्रमाणे टी. बी. कॅन्सर या आजाराची तपासणी करण्यासाठी (एच.पी.आर) पाठवण्यात येते.
डॉ. कल्पना नानजकर
सोलापूर


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here