Doctor Kalpana Nanjkar: मूळव्याधचा आयुष्यात एकदा तरी त्रास होतोच; मूळव्याध लक्षणे व उपाय

Piles Hospital In Solapur: नानजकर हॉस्पिटल व केअर सेंटरमध्ये या मुळव्याधीवर २४ तास उपचाराची सोय

0

Piles Hospital In Solapur: पाइल्स (मूळव्याध) हा मूळचा लॅटिन शब्द आहे. (Doctor Kalpana Nanjkar On Piles) त्याचा अर्थ आहे गुठळी (छोटा चेंडू) ५०% लोकांमध्ये मूळव्याधीचा आयुष्यात एकदा तरी त्रास होतोच. त्यांची ठेवण सहसा घड्याळात ३ , ७ व ११ वाजल्याप्रमाणे असते. क्वचित वेळी २.९ काट्याप्रमाणे असते. मूळतः मुळव्याध दोन प्रकारचा असतो. आतील भागात व बाहेरील भागात..! आतील मूळव्याध हा रक्तवाहिनीला सूज आल्यामुळे होतो. वारंवार घर्षणामुळे रक्तवाहिन्या मोठ्या होतात व त्यामुळे गुदद्वाराचा आकार छोटा होतो. ही घटना क्रमाने वाढत जाऊन त्याचे मोठ्या आकाराच्या मूळव्याधीमध्ये रूपांतर होते व शौचास साफ होत नाही व कुंथावे लागते.

हेही वाचा राज ठाकरे यांनी सीमाप्रश्न व राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवरून व्यक्त केला वेगळाच संशय

या दुखण्यात अन्न व पाण्याचे सेवन कमी होते. शौचास घट्ट होते व पर्यायाने अति घर्षणाने रक्तस्त्रावाची सुरुवात होते. गुदद्वाराची गादी ही स्नायूंच्या आवरणाला चिकटलेली नसल्याने शौचास साफ होण्यास जोर द्यावा लागतो. त्यामुळे सुटलेली गुठळी बाहेर येते. मुळव्याध या रोगाचे स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये प्रमाण अधिक असते. लहान मुलांमध्ये देखील हा रोग आढळतो. हवामान, आहार, स्त्रियांमध्ये गरोदरपणा, बद्धकोष्टता, विरचिकाचा अनियंत्रित वापर, बैठे काम, दारू, सिगारेट, पान, गुटखा, फास्ट फूडचे सेवन, व्यवसाय ताणतणाव, आहारातील तेलकट पदार्थाचे तंतुविरहित पदार्थाचे अतिसेवन या सर्वांमुळे शौचास घट्ट होते.

वरील सर्व कारणांच्या गोळा बेरजेने मुळव्याधीचा प्रादुर्भाव होतो. तसेच मांसाहार, मसालेदार पदार्थ व फास्टफुड, चहा कॉफीच्या अति प्रमाणात सेवन, दारू सिगारेट, पान तंबाखू, गुटखा इत्यादी व्यसने, सतत बैठे काम या अनेक कारणामुळे मुळव्याध हा होऊ शकतो. मुळव्याधसाठी पारंपारिक उपचार आहेत. परंतु मुळव्याधीचा समूळ नायनाट करण्यासाठी ती तेवढी प्रभावी नाहीत. चूर्ण औषधे आधी सर्व प्रकारचे उपचार करून कंटाळलेल्यांना ऑपरेशनसुद्धा नकोसे वाटते.

त्यावर संशोधनाअंती उपाय शोधून काढण्यात आता यश आले आहे आणि प्रगत ठिकाणी मुळव्याधीवर आता लेझर सदृश्य किरणांच्या साहाय्याने उपचाराची पद्धत विकसित झाली आहे. ही नवीन पद्धत मूळव्याधीवर खात्रीने इलाज करू शकते आणि पुन्हा कोणताही प्रादुर्भाव होणार नाही याची खात्री देऊ शकते. कोलोनोस्कोपी व सिग्माडोस्कोपी या तपासण्या देखील येतात व अचूक निदान करून वरील सर्व उपचार पद्धती ह्या त्याविषयीच्या तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येतात. मुळव्याध ह्या रोगाकडे लाजेखातर अनेक रुग्ण दुर्लक्ष करतात.

ऑपरेशनच्या भीतीमुळे डॉक्टरांकडून तपासून घेणे टाळतात. त्याचा परिणाम म्हणून मूळव्याधीची गाठ एखाद्या गंभीर आजाराची असून देखील उपचार घेतले जात नाहीत. मुळव्याध केअर सेंटरमध्ये होणाऱ्या उपचार पद्धती या अतिशय सुटसुटीत असून त्यामध्ये कोणताही रक्तस्राव होण्याची शक्यता नसते. टाके घालण्याची आवश्यकता नसते. या मुळव्याधीची महत्त्वाची लक्षणे म्हणजे वेदनारहित रक्तस्त्राव, वेदनासहित रक्तस्त्राव, शौचाच्या वेळेस शेवटी पडणारे थेंब, गुदद्वाराजवळ येणारी गाठ, खाज, लालसरपणा, पांढरा स्त्राव, गाठ मोठी होऊन आत न जाणे व काळे होणे, जंतू प्रादुर्भाव (इन्फेक्शन) होऊन क्वचित वेळा पु गळणे इत्यादी लक्षणे असू शकतात. तसेच रक्त कमी होऊन हातपाय गळतात व स्वभाव चिडखोर बनतो. कामात लक्ष लागत नाही.

आमच्या नानजकर हॉस्पिटल व केअर सेंटरमध्ये या मुळव्याधीवर खात्रीशीर उपचार पद्धती उपलब्ध असून २४ तास उपचाराची सोय, पूर्णवेळ डॉक्टर, विनम्र व तत्पर सेवा, हॉस्पिटल नव्हे तर घरच्यासारखीच सेवा व काळजी घेणारे स्टाफ, दुर्बिणीतून शस्त्रक्रिया करण्याची सोय, कुटुंबातील कोणत्याही आजारासाठी तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन उपलब्ध आहे. तसेच आतापर्यंत दहा हजार पेक्षाही जास्त मूळव्याधीग्रस्त रुग्णांवर विना ऑपरेशन यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे मुळव्याधीचे वरील लक्षण असलेल्या रुग्णांनी आमच्या नानजकर हॉस्पिटलला अवश्य भेट द्यावी असे आवाहन डॉ. कल्पना नानजकर यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here