हे अ‍ॅप करू नका डाउनलोड, होऊ शकते आर्थिक फसवणूक

0

दि.15 : ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार अलीकडच्या काळात वाढले आहेत. एखाद्या कस्टमर केअरच्या नंबरसाठी अनेकजण गुगलवर सर्च करतात. देशात इंटरनेट युजर्ससाठी कस्टमर केअर स्कॅम एक मोठी समस्या बनली आहे. अनेकवेळा गुगलवर सर्च केलेला कस्टमर केअर नंबर फेक असू शकतो. जो फसवणूक करणाऱ्यांचा असू शकतो. एखाद्या कंपनीचा कस्टमर केअर नंबर जाणून घेण्यासाठी युजर्स तो Google वर सर्च करतात आणि तो डायलही करतात. या नंबरवर फोन केल्यानंतर काही वेळातच कस्टमरच्या अकाउंटमधून पैसे गायब होतात. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत.

असल्या फसवणुकीच्या प्रकरणात रिमोट कंट्रोलवाले अ‍ॅप सर्वाधिक धोकादायक ठरतात. फ्रॉड करणारे कोणताही फ्रॉड करताना, मोबाईल युजरला त्यांच्या अँड्रॉईड फोनमध्ये रिमोट डेक्सटॉप अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी सांगतात.

फसवणूक करणारे गुन्हेगार मेसेजद्वारे लोकांना एक लिंक पाठवतात आणि रिमोट अ‍ॅक्सेस असणारं एखादं अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी सांगतात. परंतु लोकांना याबाबत जराही कल्पना नसते की, अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर, फोनचा संपूर्ण अ‍ॅक्सेस फ्रॉड करणाऱ्यांकडे जातो. त्यानंतर फ्रॉड करणारे फोनमध्ये स्क्रिन रेकॉर्डिंग सुरू करतात. त्यानंतर UPI लॉगइन करताना फोनमध्ये आलेला ओटीपी ते पाहतात.

मोबाईल फोनमध्ये TeamViewer QuickSupport, Microsoft Remote desktop, AnyDesk Remote Control, AirDroid: Remote access and File, AirMirror: Remote support and Remote control devices, Chrome Remote Desktop, Splashtop Personal- Remote Desktop हे app कधीही डाउनलोड करू नका.

हे सर्व रिमोट कंट्रोल अ‍ॅप, मालवेअर अ‍ॅप नसतात, परंतु याचा चुकीचा वापर झाल्यास, या अ‍ॅपद्वारे चुकीच्या व्यक्तीकडे फोनचा अ‍ॅक्सेस गेल्यास ते अतिशय धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे युजरला मोठं नुकसान होऊ शकतं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here