Dhananjay Munde Accident: धनंजय मुंडेंच्या गाडीला अपघात, पुढील उपचारासाठी मुंबईला हलवणार

0

बीड,दि.4: Dhananjay Munde Accident: माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde News) यांच्या वाहनाला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील भेटी आणि कार्यक्रम आटोपून परळीकडं परतत असताना हा अपघात झाला. गाडीला अपघात (Accident News) झाल्याची माहिती स्वतः धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टद्वारे (Facebook Post) दिली आहे.

नेमकं काय म्हटलं धनंजय मुंडे यांनी? | Dhananjay Munde Accident

मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील भेटी आणि कार्यक्रम आटोपून परळीकडे जात असताना रात्री साडेबाराच्या सुमारास माझ्या वाहनाचा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्यानं छोटासा अपघात झाला आहे. अपघातामध्ये माझ्या छातीला किरकोळ मार लागला आहे. डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला असून, कोणीही अफवांवर विश्वासा ठेवू नये असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

Dhananjay Munde Accident
धनंजय मुंडे

उपचारासाठी मुंबईला हलवणार… | Dhananjay Munde News

“धनंजय मुंडे यांचा छोटासा अपघात झाला, त्यामध्ये त्यांना छातीला दुखापत झाली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलवलं जाणार आहे. दुपारी दोन वाजता लातूर येथून विमानानं धनंजय मुंडे हे मुंबईकडे उपचारासाठी रवाना होतील. धनंजय मुंडे यांच्या बरगड्यांना दोन ठिकाणी मार लागला असून त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल केलं जाणार आहे.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here