devendra fadnavis: शरद पवार यांच्या निवास्थानात घुसून चप्पल फेक, देवेंद्र फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया

0

मुंबई,दि.8: devendra fadnavis: एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्या निवासस्थानात घुसून चप्पल फेक केली. यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी असा हल्ला करणे चुकीचे आहे, असे म्हटले आहे. तसेच एखाद्या मोठ्या नेत्याच्या घरापर्यंत आंदोलन जाणे समर्थनीय नसल्याचं फडणवीस म्हणालेत. फडणवीस यांनी ट्विटरवरुन आपली प्रतिक्रिय नोंदवली आहे. पवारांच्या घरासमोर झालेल्या गोंधळावर भाजपाकडून प्रतिक्रिया देणारे फडणवीस हे पहिले मोठे नेते आहेत.

“ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांच्या निवासस्थानी झालेली घटना सर्वथा चुकीची आहे. नेते कुठल्याही पक्षाचे असोत, घरांवर अशी आंदोलने अजीबात समर्थनीय नाहीत. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो,” असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मात्र एकीकडे पवारांच्या घरासमोरील गोंधळाचा निषेध करतानाच दुसरीकडे फडणवीस यांनी सरकारचेही कान टोचलेत. “गेल्या पाच महिन्यांहून अधिक काळपासून एसटी कर्मचारी आंदोलन करीत आहेत. त्यांच्या व्यथा, मागण्या योग्यप्रकारे व योग्य व्यासपीठावरच मांडल्या जाव्यात आणि त्या ऐकून घेतल्या जाव्या, अशी अपेक्षाही या निमित्ताने व्यक्त करतो,” असंही म्हटलंय.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here